World Test Championship : क्रिकेट विश्वाचे लक्ष लागून असलेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पिनयशीप 2023-2025 या साखळी फेरीच्या अंतिम सामन्याचा मुहूर्त ठरला आहे. आयसीसीने सोशल मीडियावरुन तारीख जाहीर केली असून हा महाअंतिम 11 जून ते 15 जून 2025 दरम्यान खेळवण्यात येणार आहे. या सामन्याचं आयोजन हे सलग तिसऱ्यांदा इंग्लंडमध्ये करण्यात आलं आहे.
नवी दिल्ली: क्रिकेट विश्वाचे लक्ष लागून असलेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पिनयशीप 2023-2025 या साखळी फेरीच्या अंतिम सामन्याचा मुहूर्त ठरला आहे. आयसीसीने सोशल मीडियावरुन तारीख जाहीर केली असून हा महाअंतिम 11 जून ते 15 जून 2025 दरम्यान खेळवण्यात येणार आहे. या सामन्याचं आयोजन हे सलग तिसऱ्यांदा इंग्लंडमध्ये करण्यात आलं आहे. हा महामुकाबला लंडन येथील लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंड या ऐतिहासिक स्टेडियममध्ये पार पडणार आहे. 16 जून हा राखीव दिवस असणार आहे. सद्यपरिस्थितीनुसार सलग आणि एकूण दुसऱ्यांदा टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात मानाच्या गदेसाठी हा महामुकाबला होऊ शकतो.
इंडिया-ऑस्ट्रेलिया फायनल मुकाबला होणार?
कसोटी क्रिकेटचा वर्ल्ड कप अंतिम सामना हा टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात होण्याची दाट शक्यता आहे. ताज्या आकडेवारीनुसार, wtc पॉइंट्स टेबलमध्ये दोन्ही संघ अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या स्थानी विराजमान आहेत. टीम इंडियाने या साखळीतील 9 पैकी 6 सामन्यात विजय मिळवला आहे. त्यामुळे टीम इंडियाची विजयी टक्केवारी ही 68.52 इतकी आहे. तर ऑस्ट्रेलिया दुसऱ्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाच्या तुलनेत 3 सामने जास्त खेळले आहेत. ऑस्ट्रेलियाने 12 पैकी 8 सामने जिंकले आहेत. कांगारुंची विजयी टक्केवारी ही 62.50 इतकी आहे. न्यूझीलंड तिसर्या तर इंग्लंड चौथ्या क्रमांकावर आहे.