Spot in Jalna Steel Company: जालन्यात स्टील कंपनीच्या भट्टीत भीषण स्पोट; २० कामगार जखमी, ४ जण गंभीर

Spot in Jalna Steel Company

Spot in Jalna Steel Company: जालना येथील गजकेशरी स्टील कंपनीतील भट्टीत भीषण स्फोट झाल्याची घटना शनिवार २४ ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास घडली. या स्फोटात कंपनीतील २० कामगार जखमी झाले असून, चार जण गंभीर असल्याची माहिती आहे. जखमींवर छत्रपती संभाजीनगर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Spot in Jalna Steel Company
Spot in Jalna Steel Company

जालना  : स्टील उद्योगांची पंढरी असलेल्या जालना येथील जालना येथील गजकेशरी स्टील कंपनीतील भट्टीत भीषण स्फोट झाल्याची घटना शनिवार २४ ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास घडली. या स्फोटात कंपनीतील २० कामगार जखमी झाले असून, चार जण गंभीर असल्याची माहिती आहे.

जखमींवर छत्रपती संभाजीनगर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी सांगितले की, जखमींवर उपचार सुरू आहेत. अद्याप त्यांचे जवाब घेण्यात आले नाही. त्यामुळे घटना कशी घडली याबाबत चौकशी करण्यात येणार आहे. अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नसल्याचेही त्यांनी सांगितले.

भट्टीतील लाव्हा अंगावर पडल्याने गंभीर जखमी

स्पोटादरम्यान भट्टीतील लाव्हा अंगावर पडल्याने तीन ते चार कामगार गंभीर भाजल्याची माहिती समोर आली आहे.  जखमींना उपचारासाठी तत्काळ खासगी रुग्णालयात हलविण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »