Akola News : अकोल्यात हिंदू राष्ट्र समन्वय समिती आक्रमक; बांगलादेशात हिंदूंच्या रक्षणाची मागणी

 Akola News

 Akola News : बांगलादेशात अल्पसंख्यक हिंदूंवर सुरू असलेल्या अत्याचार आणि मंदिरांच्या तोडफोड या विरोधात हिंदू संघटना आक्रमक झाल्या. या घटनांचा निषेध व्यक्त करत अकोल्यातील विविध हिंदू संघटनांनी हिंदू राष्ट्र समन्वय समितीच्या माध्यमातून एकत्रीत येवून सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने दिली.

 Akola News
Akola News: अकोल्यात हिंदू राष्ट्र समन्वय समिती आक्रमक, बांगलादेशात हिंदूंच्या रक्षणाची मागणी

अकोला : बांगलादेशात अल्पसंख्यक हिंदूंवर सुरू असलेल्या अत्याचार आणि मंदिरांच्या तोडफोड या विरोधात हिंदू संघटना आक्रमक झाल्या. या घटनांचा निषेध व्यक्त करत अकोल्यातील विविध हिंदू संघटनांनी हिंदू राष्ट्र समन्वय समितीच्या माध्यमातून एकत्रीत येवून सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने दिली. या प्रसंगी भारत सरकारने बांगलादेशातील हिंदू आणि मंदिरांचे रक्षण करावे, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधान यांना केली.
आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुरू झालेले हिंसक आंदोलन हिंदू विरोधात भडकले. बांगलादेशात अल्पसंख्यांक असलेल्या हिंदू समाजावर होत असलेला अत्याचार आणि तेथील हिंदू मंदिरांची होणारी तोडफोड या विरोधात केंद्र शासनाने तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी हिंदू संघटनांकडून होत आहे. बांगला देशात २७ ठिकाणी हिंदूंना लक्ष्य करण्यात आले असून त्यांची हत्या करण्यात येत आहे. हिंदूंच्या घरांवर आक्रमण करणे, हिंदूंची दुकाने लुटणे, हिंदू महिलांवर अत्याचार करण्यात येत आहेत. या घटनांविरोधात भारत सरकारने तातडीने पावले उचलावीत, या मागणीसाठी सोमवारी विविध हिंदू संघटना आणि संप्रदाय यांनी संघटीत होवून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने देण्यात आले. यावेळी हिंदू राष्ट्र समन्वय समितीतर्फे जिल्हाधिकारी यांच्या मार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन देण्यात आले.

या संघटनांचा होता सहभाग

बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचारा विरोधात सोमवारी अकोल्यातील हिंदू संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने दिली. यामध्ये हिंदू राष्ट्र समन्वय समिती, हिंदू जागरण मंच, आदर्श गोरक्षण सेवा, नवयुवक जनसेवा संघटना, विदर्भ क्रांती, विश्व हिंदू व्यापार संघ, तेजस्विनी बहुद्देशिय संस्था आदिंचा सहभाग होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »