Chhatrapati Sambhajinagar News : आचासंहितेचे कारण सांगून शेतकऱ्यांना मूर्ख बनवण्याचे काम सुरु – विरोधी पक्षनेते वडेट्टीवार

दुष्काळग्रस्त भागाचा पाहणी दौऱ्या दरम्यान स्थानिकांसोबत संवाद साधताना विजय वडेट्टीवार व इतर

Chhatrapati Sambhajinagar News : शेतकऱ्यांना आचारसंहिता सांगतात, मात्र तिकडे टेंडर काढतात. शेतकऱ्यांच्या मदतीला निवडणूक आयोगाकडून परवानगी मिळाली असती, मात्र यांना परवानगी द्यायची नाही अशा शब्दांत विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र डागले.

दुष्काळग्रस्त भागाचा पाहणी दौऱ्या दरम्यान स्थानिकांसोबत संवाद साधताना विजय वडेट्टीवार व इतर
दुष्काळग्रस्त भागाचा पाहणी दौऱ्या दरम्यान स्थानिकांसोबत संवाद साधताना विजय वडेट्टीवार व इतर

छत्रपती संभाजीनगर : हे सरकार टेंडर आणि टक्केवारीमध्ये व्यस्त आहे. आचासंहितेचे कारण सांगून शेतकऱ्यांना मूर्ख बनवण्याचे काम सुरु आहे. दुसरीकडे निवडणूक आयोगाची परवानगी घेऊन 25 हजार कोटींचे टेंडर काढले आहेत. शेतकऱ्यांना आचारसंहिता सांगतात, मात्र तिकडे टेंडर काढतात. शेतकऱ्यांच्या मदतीला निवडणूक आयोगाकडून परवानगी मिळाली असती, मात्र यांना परवानगी द्यायची नाही अशा शब्दांत विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र डागले.
दुष्काळग्रस्त भागाचा पाहणी दौरा करण्यासाठी विजय वडेट्टीवार गुरुवार 30 मे रोजी छत्रपती संभाजीनगर आणि जालना दौऱ्यावर असताना त्यांनी हे भाष्यं केले. पुढे ते म्हणाले की, राज्यासह मराठवाड्यात तीव्र दुष्काळी परिस्थिती आहे. राज्यात गेल्या वर्षात जास्त वेळा अवकाळी आणि गारपीट झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले. या नुकसानीचे पंचनामे होतात, मात्र मदत मिळत नाही. पिण्याच्या पाण्यापासून तर शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्याचे काम केले जात आहे. अशा शब्दांत वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र डागले.

फळबागांची केली पाहणी

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दुष्काळग्रस्त बदनापूर तालुक्यातील म्हसला- भातखेडा येथील डाळिंब व मोसंबी बागांची पाहणी केली. यावेळी डॉ. कल्याणराव काळे, शिवसेना उपनेते लक्ष्मणराव वडले, चंद्रकांत दानवे, आमदार संतोष सांबरे, काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष राजा देशमुख, कार्याध्यक्ष राजेंद्र राख, बबलू चौधरी व महाविकास आघाडीचे पदाधिकारी व परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जवखेड्यातील संत्रे कुटुंबीयांची घेतली भेट

भोकरदन तालुक्यात जवखेडा गावात मारहाण करून घर उध्वस्त केल्याचा गंभीर आरोप संत्रे कुटुंबियानी केला. राष्ट्रीय महामार्ग बनवण्यासाठी नियमाचे उलंघन करून घर उद्धवस्त केल्याचा देखील संत्रे कुटुंबाचा आरोप आहे. मारहाण आणि घर पाडल्यानंतरचे संत्रे कुटुंबाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या अन्यायग्रस्त संत्रे कुटुंबाची जवखेडा येथे जाऊन विजय वडेट्टीवार यांनी भेट घेतली.

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबाची भेट

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात शेतकऱ्याने आत्महत्या केली होती. लाडसावंगी पंचायत समिती गणातील पिंपळखुंटा येथील विठ्ठल नामदेव दाभाडे (५२) यांनी शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या कुटुंबियांची विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी गुरुवारी भेट घेतली. यावेळी कृषिमंत्र्यासह राज्य सरकारवर टीका केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »