Uproar at Dombivli :  एकापाठोपाठ तीन शक्तीशाली स्फोट; सहा जणांचा मृत्यू

डोंबिवलीत हाहाःकार :  एकापाठोपाठ तीन शक्तीशाली स्फोट; सहा जणांचा मृत्यू

Uproar at Dombivli : डोंबिवली एमआयडीसीमध्ये अंबर नावाच्या कंपनीत मोठा स्फोट झाल्याची घटना 23 मे रोजी दुपारच्या सुमारास घडली. स्फोटाचा आवाज इतका मोठा होता की, दोन किमीपर्यंतची धरती हादरली. एकापाठोपाठ तीन शक्तीशाली स्फोटाने सर्वांचा थरकाप उडाला.

डोंबिवलीत हाहाःकार :  एकापाठोपाठ तीन शक्तीशाली स्फोट; सहा जणांचा मृत्यू
डोंबिवलीत हाहाःकार :  एकापाठोपाठ तीन शक्तीशाली स्फोट; सहा जणांचा मृत्यू

मुंबई : डोंबिवली एमआयडीसीमध्ये अंबर नावाच्या कंपनीत मोठा स्फोट झाल्याची घटना 23 मे रोजी दुपारच्या सुमारास घडली. स्फोटाचा आवाज इतका मोठा होता की, दोन किमीपर्यंतची धरती हादरली. एकापाठोपाठ तीन शक्तीशाली स्फोटाने सर्वांचा थरकाप उडाला. या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला आहे.
डोंबिवली एमआयडीसी फेस 2 येथे असलेल्या अंबर केमिकल कंपनीत झालेल्या स्फोटामुळे मोठा हाहा:कार उडाला आहे. अंबर केमिकल कंपनीत आज दुपारी दीड वाजेच्या सुमारास बॉयरलचा मोठा स्फोट झाला. या स्फोटानंतर एकामागेएक असे तीन मोठ्या स्फोटांचा आवाज आला. या परिसरातील इमारतींच्या काचा फुटल्या. तसेच अनके घरांचे पत्र उडाले. रोडवर असणाऱ्या वाहनांच्या काचा फुटल्या. स्फोटानंतर कंपनीला भीषण आग लागली. या आगीवर नियंत्रण मिळवणे हे अग्निशमन दलाच्या जवानांसाठी मोठे आव्हान आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत बॉयलर जवळ काम करत असणाऱ्या सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. घटना घडली तेव्हा कंपनीत कर्मचारी काम करत होते. त्यामुळे या स्फोटामुळे धाकधूक वाढली आहे.

परिसरातील इमारती, घरे आणि दुकानांचे नुकसान

या घटनेमुळे परिसरातील इमारती, घरे आणि दुकानांचे नुकसान झाले आहे. आतापर्यंत 25 ते 30 जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. जखमींमध्ये परिसरातील स्थानिकांचा देखील समावेश असल्याची माहिती मिळत आहे. स्फोटानंतर परिसरात एका बालरुग्णालयाचे काचेचं गेटचा चक्काचूर झाला आहे. अगदी पावडर सारखं काचेचा खच रुग्णालयाबाहेर पडला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »