Rs 1 crore seized from car: गेवराई तालुक्यातील खामगावमध्ये असलेल्या जिल्ह्याच्या बॉर्डरवर चेक पोस्टवर एका कारमधून पोलिसांनी सुमारे एक कोटी रुपये जप्त केल्याची माहिती पुढे आली आहे.
छत्रपती संभाजीनगर /बीड : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र चेकपोस्ट लावण्यात आलेले आहेत. यामध्येच बीडमध्ये कोट्यवधी रुपये जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. गेवराई तालुक्यातील खामगावमध्ये असलेल्या जिल्ह्याच्या बॉर्डरवर चेक पोस्टवर एका कारमधून पोलिसांनी सुमारे एक कोटी रुपये जप्त केल्याची माहिती पुढे आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील चेकपोस्टवर कारमधून तब्बल एक कोटी रुपयांची रोकड पोलिसांनी जप्त केली. पण ही कोट्यवधींची रक्कम छत्रपती संभाजीनगर येथील बँकेच्या शाखेतून काढली असल्याचे सांगण्यात आले आहे. परंतु, ही रक्कम खरोखरच छत्रपती संभाजीनगरमधील शाखेतून काढली गेली की नाही, याचा तपास पोलिसांकडून करण्यात येणार आहे. पण ही रक्कम बीड येथील व्दारकादास मंत्री बँकेच्या मुख्य शाखेत आणली जात होती, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. गेवराई तालुक्यातील चेकपोस्टवर पोलिसांनी कारची झडती घेतली असता, त्यांना वाहनात रक्कम सापडली. तर या रोकडसोबत संभाजीनगर येथून पैसे बाळगण्याचे परवानगी पत्र होते असे पोलिसांचे म्हणणे आहे.