Sadichchadu:सदिच्छादूत प्रथमेश अन् मोनाली करणार मतदारांना आवाहन

मोनाली जाधव

 Sadichchadu:राज्यात प्रत्येक जिल्ह्यात वेगवेगळ्या क्षेत्रात कार्य करणारे असे काही मान्यवर असतात जे समाजाला प्रेरित करतात. हेच मान्यवर आता सदिच्छादूत म्हणून काम करणार आहेत.

प्रथमेश जावकर
प्रथमेश जावकर

बुलढाणा ः राज्यात प्रत्येक जिल्ह्यात वेगवेगळ्या क्षेत्रात कार्य करणारे असे काही मान्यवर असतात जे समाजाला प्रेरित करतात. हेच मान्यवर आता सदिच्छादूत म्हणून काम करणार आहेत. बुलढाण्यात प्रथमेश जावकर आणि मोनाली जाधव हे सदिच्छादूत म्हणून काम करणार आहेत.
अहमदनगरसाठी पद्मश्री राहीबाई पोपरे, प्रणिता सोमण, शिवम लोहकरे, मिलिंद शिंदे, आरुष बेडेकर, वेदांत वाघमारे हे अहमदनगर जिल्ह्यात मतदारांनी मतदान करावे यासाठी आवाहन करणार आहेत. अकोल्यात पलक झांबरे आणि अमरावतीमध्ये संकेत जोशी मतदारांना आवाहन करणार आहेत. बीडमध्ये योगेश्वर घाटबंधे, मयुरी लुते सदिच्छादूत म्हणून काम करणार आहेत.

मोनाली जाधव
मोनाली जाधव

औरंगाबादमध्ये नवेली देशमुख, उस्मानाबादमध्ये राहुल लखाडे, धुळेमध्ये वैष्णवी मोरे आणि पार्वती जोगी, गडचिरोलीमध्ये पद्मश्री डॉ. परशुराम खुणे, गोंदियामध्ये मुनालाल यादव, जळगावमध्ये निलिमा मिश्रा, जालनामध्ये किशोर डांगे, डॉ. निकेश मदारे आणि निशा पुरी सदिच्छादूत म्हणून काम करणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »