Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीचा प्रबळ उमेदवार म्हणून त्यांच्याकडे बघितले जात होते. मात्र, एैनवेळी सतिश पवार यांना डावलून वसंत मगर यांना उमेदवारी मिळाल्याने त्यांनी जिल्हाभरात जोडलेल्या निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरल्याचे चित्र दिसून येत आहे. कार्यकर्त्यांच्या या नाराजीचा फटका वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार वसंत मगर यांना बसू शकतो, अशी कुजबुज आता लोकसभा मतदार संघात एैकायला मिळत आहे.
पृथ्वीराज चव्हाण / बुलढाणा : अलिकडच्या काही वर्षात बुलढाणा जिल्ह्यात काहीशी सुप्त झालेल्या आंबेडकरी चळवळीला विशेष करून युवकांना उभारी देण्याचे कार्य वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून युवानेते सतिश पवार यांनी केले. बुलढाण्यात 9 मार्चला पार पडलेल्या एैतिहासिक धम्म परिषदेच्या माध्यमातून त्यांनी आपली सामाजिक बांधीलकीही सिध्द केली. केवळ सामाजिकच नव्हेतर बेरोजगार युवकांवरील अन्याया विरोधातही त्यांनी ठोस भूमिका घेऊन जिल्ह्यातील बहुजनांना जवळ करण्याची किमयाही केली. त्यांचे कार्य पाहता, लोकसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीचा प्रबळ उमेदवार म्हणून त्यांच्याकडे बघितले जात होते. मात्र, एैनवेळी त्यांना डावलून वसंत मगर यांना उमेदवारी मिळाल्याने त्यांनी जिल्हाभरात जोडलेल्या निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरल्याचे चित्र दिसून येते.
जिल्ह्यातील विद्यार्थी व सुशिक्षित बेरोजगारांचे प्रश्न मांडणारा युवा नेता म्हणून पवारांनी ओळख निर्माण केली. विद्यार्थ्यांसाठी काढलेला एल्गार मोर्चा, ठिय्या आंदोलने, टॉवर आंदोलन तसेच ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमात दिलेले विद्यार्थ्यांचे एक लाख स्वाक्षऱ्यांचे निवेदन हे युवा वर्गाला विशेष भावले. अनेक वर्षांपासून न्यायालयात प्रलंबित असलेल्या हजारो प्रकरणांसंदर्भात त्यांनी केलेले आंदोलन हे कक्षेबाहेरचे असल्याने लोकांच्या कायम स्मरणात राहिले. त्यांच्या आंदोलनाची न्यायालयाने दखल घेत न्यायाधीशांची रिक्तपदे भरण्यात आली.
जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांवर केलेली निलंबनाची अन्यायकारक कारवाई मागे घ्यायला प्रशासनाला भाग पाडले. अनेक प्रस्थापित सावकारांच्या जबड्यातून त्यांनी गरिबांच्या जमिनी सोडवून आणल्या. एवढेच नाही तर सावकार व त्यांच्या गुंडांवर कायदेशीर कारवाईसुद्धा करण्यास यंत्रणेला भाग पाडले. राज्य सरकारने कंत्राटी तत्वावर अधिकारी व कर्मचाऱ्यांची भरती करण्याचा काढलेल्या अन्यायकारक अध्यादेशाची त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जाहीर होळी केली. अध्यादेशाविरुद्ध आंदोलन करणारे ते महाराष्ट्रातील पहिले नेते ठरले आहे. वसंतराव मगर यांना वंचितची उमेदवारी जाहीर झाल्याने पवार यांच्या उमेदवारीची चर्चा संपुष्टात आली. त्यामुळे पक्षाने दिलेल्या उमेदवाराचे काम करणे प्रत्येक कार्यकर्त्याचे कर्तव्य असते. यासोबतच पक्षाने दिलेल्या उमेदवाराने देखील आपल्या मतदार संघातील क्रियाशील नेत्याची भेट घेणे आवश्यक असते. मात्र उमेदवारी अर्ज भरताना देखील सतीष पवार यांना टाळण्यात आल्याचे दिसून आले त्यामुळे सतिश पवार यांच्या समर्थकात रोष आहे.
मतदार संघात निर्णायक मते
बुलढाणा जिल्ह्याची सामाजिक राजकीय परिस्थिती लक्षात घेतली असता लोकसभा मतदार संघातील लोकसंख्येच्या 18.09 टक्के मतदान हे अनुसुचित जातीचे आहे. मतदारांची टक्केवारी १८.०९ टक्के आहे. यामध्ये अनुसुचित जमातींची टक्केवारी ०४.०7 टक्के इतकी आहे.तर मुस्लिम मतदार ११.०६ टक्के इतकी आहे. यामध्ये केवळ बौध्द समाजाचे चार लाखाच्यावर मतदार आहेत. हे मतदान निर्णायक ठरणारे आहे.
फोटो