Jalna Police: जालना पोलिसांनी कुख्यात गुंड टायगरच्या मुसक्या आवळल्या

The Jalna police have arrested the notorious gangster Tiger

Jalna Police: विविध नावे बाळगून वावरणारा विलास देविदास पवार (टायगर) हा नांदेडसह जालना पोलिसांना चकमा देत होता. त्या अटक करण्यात अखेर जालना पोलिसांना यश आले आहे.

The Jalna police have arrested the notorious gangster Tiger
The Jalna police have arrested the notorious gangster Tiger

जाफ्राबाद (जि. जालना) : गजानन मच्छिंद्रनाथ त्तौर हत्या प्रकरणातील विविध नावे बाळगून वावरणारा विलास देविदास पवार (टायगर) हा नांदेडसह जालना पोलिसांना चकमा देत होता. त्या अटक करण्यात अखेर जालना पोलिसांना यश आले आहे.
आरोपी विलास देविदास पवार (टायगर) हा सापडत नसल्याने नांदेड पोलिसांनी त्यावर ५० हजाराचे बक्षीसही ठेवले होते. दरम्यान जालना पोलिसांनी चौकशी केली असता नांदेडला रणवीर सिंग देविदास पवार जालन्यात पाजी, शेरा, टायगर, महाराज तर पंजाबमध्ये हा सुखदेव सिंग देविसिंग पवार या नावाने वावरत होता. वेगवेगळ्या नावाने वावरणारा विलास पवार (टायगर) याला अमृतसर येथून जालना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता ८ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. हल्ला केलेल्या दिवशीचे पिस्तूल घराची रेकी करताना वापरलेली कार जप्त करण्यासाठीही पोलीस कोठडी मिळाली आहे. या कारवाईसाठी जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, उपविभआगीय पोलीस अधिकारी आयुष नोपाणी, डीवायएसपी कुलकर्णी, पोलीस निरीक्षक यांचे मार्गदर्शन लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »