Khedekar VS Prataprao Jadhao: प्रॉपर्टीत महाविकास आघाडीचे खेडेकर महायुतीच्या प्रतापरावांपुढे तोकडे

Khedekar VS Prataprao Jadhao

Khedekar VS Prataprao Jadhao: लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात एकमेकांपुढे उभे ठाकलेल्या महायुतीचे उमेदवार प्रताप जाधव व महाविकास आघाडीचे उमेदवार प्रा. नरेंद्र खेडेकर यांच्या चल, अचल संपत्तीचे विवरण पाहता 16 कोटीच्यावर संपत्ती असलेले प्रताप जाधव यांच्यासमोर महाविकास आघाडीकडून नामांकन अर्ज दाखल करणारे प्रा. नरेंद्र खेडेकर यांच्याकडे केवळ 4 कोटी 47 लाख 50 हजार रूपये एव्हढी संपत्ती असल्याचे नामांकन अर्जासोबत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात नमूद आहे.

Khedekar VS Prataprao Jadhao
Khedekar VS Prataprao Jadhao

पृथ्वीराज चव्हाण/बुलढाणा : सत्ता आणि संपत्तीच्या बळावरचं यश, अपयशाची सगळी गणिते अवलंबून असतात. राजकीय आखाड्यात टिकून राहायचे असेल तर संपत्तीचाही महत्वाचा रोल असतो. सद्या लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात एकमेकांपुढे उभे ठाकलेल्या महायुतीचे उमेदवार प्रताप जाधव व महाविकास आघाडीचे उमेदवार प्रा. नरेंद्र खेडेकर यांच्या चल, अचल संपत्तीचे विवरण पाहता 16 कोटीच्यावर संपत्ती असलेले प्रताप जाधव यांच्यासमोर महाविकास आघाडीकडून नामांकन अर्ज दाखल करणारे प्रा. नरेंद्र खेडेकर यांच्याकडे केवळ 4 कोटी 47 लाख 50 हजार रूपये एव्हढी संपत्ती असल्याचे नामांकन अर्जासोबत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात नमूद आहे.
आज, नरेंद्र खेडेकर यांनी आज नामांकन दाखल केले. निवडणूक आयोगाला दिलेल्या शपथपत्रात त्यांची चल आणि अचल संपत्ती मिळून एकुण 4 कोटी 47 लाख 40 हजार रुपये आहे. त्यापैकी त्यांच्या पत्नीच्या नांवावर 71 लाख 66 हजार रुपये आहेत. शेती आणि सेवानिवृत्तीमधून त्यांनी संपत्ती अर्जीत केली आहे. त्यांच्याकडे 55 हजार आणि अर्धांगिनी सौ. अर्चनाताई यांच्याकडे 48 हजार 500 रुपये आहेत. चिखलीच्या एसबीआय शाखेत खेडेकर यांचे 12 लाख 19 हजार 435 आणि 6 लाख 98 हजार 759 रुपये जमा आहेत. तर अशीच दोन खाती सौ. खेडेकर यांचीही आहेत. एकात 18 हजार 834 तर दूसर्‍या खात्यात 6 लाख 98 हजार 759 रुपये आहेत. मुदत ठेव म्हणून 1 कोटी रूपये दोघांनी एसबीआय चिखलीमध्ये ठेवलेले आहेत. नरेंद्र खेडेकर यांच्याकडे 2021 मध्ये घेतलेली एक फॉर्च्यूनर (एमएच 28 बीके 9393) क्रमांकाची चारचाकी आहे. सौ. अर्चनाताईंकडे 24 लाख रुपयांचे दागिने आहेत. खासदारकी लढविणार्‍या खेडेकर यांच्याकडे केवळ 1 एकर 15 गुंठे शेती आहे. शेलूदमध्ये प्लॉट, चिखलीमध्ये 800 स्न्वेअर फूट जमीन तसेच 7 हजार स्न्वेअर फूटचा प्लॉट आहे. याशिवाय 900 स्न्वेअर फूट जागा तसेच निवासी ईमारत, ज्यावर 6 हजार स्न्वेअर फूट बांधकाम आहे, जिचे मूल्य आजच्या बाजारभावानुसार एक कोटी रूपये आहे.
अमरावतीच्या शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातून विद्युत अभियांत्रिकीची पदविका धारण केलेले नरेंद्र खेडेकर 58 वर्षांचे आहेत. 2021 मध्ये कोरोना काळात त्यांनी पोस्टर जाळणे आणि घोषणा देणे बद्दल सथीचे रोग अधिनियम व आपत्ती व्ववस्थापन कलम 51 बी नुसार एकमात्र गुन्हा दाखल आहे. त्यांना कर्ज काढण्याची आवश्यकता पडलेली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »