Had to drink alcohol and message the collector: मध्यरात्रीच्या सुमारास डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या एका कर्मचार्याने दारु पिवून चक्क जिल्हाधिकार्यांना माझ्या जिवाचे बरेवाईट झाल्यास त्याला जिल्हाधिकारी आणि निवडणूक आयोग जबाबदार असेल असा मॅसेज केला. त्यानंतर बुधवारी छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकार्यांनी त्या कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई केली.
छत्रपती संभाजीनगर: मध्यरात्रीच्या सुमारास विद्यापीठाच्या एका कर्मचार्याने दारु पिवून चक्क जिल्हाधिकार्यांना माझ्या जिवाचे बरेवाईट झाल्यास त्याला जिल्हाधिकारी आणि निवडणूक आयोग जबाबदार असेल असा मॅसेज केला. त्यानंतर बुधवारी त्या कर्मचार्याला जिल्हाधिकार्यांनी निलंबीत केले. संदीप बुरसे असे कर्मचार्याचे नाव असून, तो ड्रामा विभागात कनिष्ठ सहाय्यक म्हणून कार्यरत आहे.
लोकसभेच्या 107 निवडणूक विभागात संदीप बुरसे हा प्रर्यवेक्षक म्हणून कार्यरत होता. 31 मार्च रोजी तो आपल्या विद्यापीठातील सहकार्यांसह जे की, निवडणूक विभागात देखील कार्यरत आहेत. त्यांच्यासोबत तो दारु पार्टीसाठी शहरालगतच्या एका ढाब्यावर गेला होता. तेथे त्यांच्यात बील देण्यावरुन वाद होऊन वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. त्यानंतर बुरसेचे सहकारी तेथून निघुन गेले व ते बील बुरसे याला देण्यास भाग पडल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यानंतर दारुच्या नशेत बुरसे याने माझ्या जीवाचे बरे वाईट झाल्यास त्याला निवडणूक आयोग जबाबदार असेल असा मजकूर असलेला मॅसेज जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांना व्हॉट्स केला. या प्रकाराची गंभीर दखल घेत बुरसे याला बुधवारी निलंबीत केल्याची माहिती जिल्हाधिकारी स्वामी यांनी दिली.
काय होता मजकूर?
सर याने मला बोलावले होते, म्हणून मी गेलो. सर त्याने मला मारले, मग मी मारले त्यात माझे काय चुकले. माझ्या जिवाला धोका आहे. यास आपण व आपले निवडणूक आयोग जबाबदार आहे. असा अशायचा मजकुर मॅसेजमध्ये होता. याव्यतरिक्त आणखी काही मजकुर देखील मॅसेज मध्ये आहे. यासर्व मॅसेजचे स्क्रीन शॉट काढून ठेवल्याचे देखील जिल्हाधिकारी स्वामी यांनी सांगितले.