the farmers of Bhokardan produced 230 quintals of ginger in 36 bundles: तालुक्यातील कोदा येथील प्रगतशील शेतकरी उखाजी बोराडे यांनी आपल्या ३६ गुंठे शेतामध्ये लाखो रूपायाचे आल्याचे पीक घेतले आहे. आल्याला यावर्षीच्या हंगामामध्ये दहा ते बारा हजार रुपयांपर्यंत सध्याचे दर असून त्यामुळे त्यांच्या आल्याला चांगला भाव मिळाला आहे.
भोकरदन (जि. जालना) : तालुक्यातील कोदा येथील प्रगतशील शेतकरी उखाजी बोराडे यांनी आपल्या ३६ गुंठे शेतामध्ये लाखो रूपायाचे आल्याचे पीक घेतले आहे. आल्याला यावर्षीच्या हंगामामध्ये दहा ते बारा हजार रुपयांपर्यंत सध्याचे दर असून त्यामुळे त्यांच्या आल्याला चांगला भाव मिळाला आहे. त्यांनी ३६ गुंठ्यामध्ये तब्बल २३० क्विंटल आलं काढले. त्यामध्ये त्यांनी आधुनिक पद्धतीने आल्याचे संगोपन व व्यवस्थापन केले. त्यांनी केलेल्या नावीन्यपूर्ण प्रयोगामधून त्यांना यावर्षी लाखो रूपायाचे उत्पन्न मिळाले आहे.
एरवी आलं या पिकाला हजार रुपयांपासून तर दोन तीन हजार रुपयापर्यंत प्रतिक्विंटल भाव असतो. त्यामुळे शेतकऱ्यांना झालेला खर्चसुद्धा यापुढे निघत नाही. परंतु यावर्षी अचानकपणे आलं या पिकासाठी यावर्षी चांगला भाव मिळत आहे. त्यामुळे काही दिवसापासून या पिकाला सात ते आठ हजार रुपये भाव होता. परंतु आत्ताच्या परिस्थितीमध्ये बाजारभावाप्रमाणे प्रतिक्विंटल १२ ते १३ हजार रुपये पर्यंत मार्केटमध्ये आलं पिकाला भाव मिळाला असून, त्यांना तब्बल २५ लाख रुपयाचे उत्पन्न निघाले आहे. अनेक वर्षापासून ते आलं आणि विविध पिके घेत असताना आतापर्यंत त्यांना कुठल्याच प्रकारच्या पिकांमधून एवढा मोठा नफा मिळाला नाही.
परंतु यावर्षी नशिबाने साथ दिल्यामुळे व चांगला बाजार भाव मिळाल्यामुळे त्यांच्या मेहनतीची चीज झाले आहे. या संदर्भात उखाजी बोराडे यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, मी दरवर्षी आलं पीक घेतो. काही वेळेला या पिकामुळे औषधी खत व मजुरीचासुद्धा खर्च निघाला नाही. परंतु यावर्षी बाजारामध्ये चांगला भाव मिळाल्यामुळे दोन-तीन वर्षा पासून जे झालेलं नुकसान होतं ते यामुळे भरून निघाले आहे.
आलं पिकातून शेतकऱ्याला मिळाले लाखो रुपये
भोकरदन तालुक्यातील कोदा येथील उखाजी बोराडे यांना ३६ गुंठे शेतीतून तब्बल २२५ क्विंटल आलं पिकाचं उत्पादन काढलं. भोकरदन तालुक्यातील कोदा गावातील प्रगतशील शेतकरी उखाजी बोराडे यांनी २० मे २०२३ रोजी माहीम जातीची व्हरायटी असलेली आल्याचे दहा क्विंटल बियाणांची लागवड ३६ गुंठे शेतात केली होती.
आत्ताच्या परिस्थितीमध्ये १६ गुंठ्यामधील आलं काढले असता या १६ गुंठ्यामधील आलं ११५ क्विंटल निघाली आहे. अजून 20 गुंठ्यामधील आलं काढणीचे काम सुरू असून यामध्ये १२० ते १३० क्विंटल आलं अजून निघू शकते असे बोराडे यांनी सांगितले आहे. यामध्ये त्यांना आतापर्यंत एका क्विंटलचे १२ हजार रूपये बाजार भाव मिळाले असुन शेवटपर्यंत हे भाव कायम राहिल्यास ३६ गुंठे शेतात जवळपास २२५ किंवटल २७ लाख रूपायांची आलं निघणार असल्याचा अंदाज बोराडे यांनी व्यक्त केला आहे.