dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

भारताने जिंकला आशिया कप; पाकिस्तानचा पराभव

अल अमीरात :  अंडर-१९ आशिया कपच्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानचा एका विकेटने पराभव केला. शनिवारी अल अमेरात येथे भारताने नवव्यांदा ही स्पर्धा जिंकली.

मोहितने शेवटच्या चेंडूवर चौकार मारत विजय मिळवून दिला

अल अमीरात :  अंडर-१९ आशिया कपच्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानचा एका विकेटने पराभव केला. शनिवारी अल अमेरात येथे भारताने नवव्यांदा ही स्पर्धा जिंकली.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर, पाकिस्तानने ५० षटकांत ९ गडी गमावून ३३७ धावा केल्या. उस्मान खानने ११ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने १०७ धावा केल्या, तर अब्दुल कादिरने ८० धावांचे योगदान दिले. भारताकडून काव्य पटेलने ४ बळी घेतले, तर सी. व्यंकटने ३ गडी बाद केले. प्रत्युत्तरात, भारतीय संघाने ४९.६ षटकांत ९ गडी गमावून ३३९ धावा करत विजयाचे लक्ष्य गाठले. कर्णधार लक्ष्य रायचंदानीने ५ चौकारांसह ८० धावांची खेळी केली, तर आर्यवीर सेहवागने ९ चौकारांच्या मदतीने ५८ धावा केल्या. शेवटच्या चेंडूवर चौकार मारून मोहितने भारताला विजय मिळवून दिला; त्याने एकूण ४९ धावा केल्या.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top