वाशिम : जिल्ह्यात अवैधरित्या गोवंश वाहतुकीविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई केली. मंगरुळपीर-वाशिम मार्गावरील कळंबा फाटा येथे शुक्रवारी (दि. १४) पहाटे ५.३० वाजताच्या सुमारास दोन महिंद्रा अॅपे मालवाहू वाहनांना अडवून तपासणी केली असता, त्यामध्ये निर्दयीपणे कोंबून वाहतूक केली जात असलेले आठ बैल आढळून आले. या कारवाईत आठ गोवंश जनावरे आणि दोन वाहने असा एकूण अंदाजे १३ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

जिल्हा पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे-पाटील यांनी जिल्ह्यात अवैध गोवंश वाहतुकीविरोधात कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार पेट्रोलिंगवर असलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मंगरुळपीर-वाशिम मार्गाने दोन वाहनांतून गोवंशाची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पथकाने कळंबा फाटा येथे सापळा रचून एमएच ३७ टी १९६२ आणि एमएच ०३ सीपी ५८८५ क्रमांकाची वाहने अडवली.
वाहनांची तपासणी केली असता, जनावरांना वाहनांमध्ये निर्दयतेने कोंबून ठेवण्यात आल्याचे तसेच वाहतुकीदरम्यान चारा-पाण्याची कोणतीही व्यवस्था नसल्याचे आढळले. आवश्यक कागदपत्रांशिवाय कत्तलीच्या उद्देशाने ही वाहतूक केली जात असल्याचेही पोलिसांच्या निदर्शनास आले. याप्रकरणी मोहम्मद फैजान मोहम्मद जावेद (वय २८, रा. दर्गा चौक, बढाईपुरा, मंगरुळपीर) आणि जावेद अहमद अब्दुल रऊफ (वय ४५, रा. टेकळीपुरा, मंगरुळपीर) यांच्याविरुद्ध विविध कलमान्वये आसेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.