dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

मलकापूर, नांदुऱ्यासह खान्देशात भूकंपाचे सौम्य धक्के: सुमारे चार सेकंद जाणवले भूकंपाचे धक्के; नागरिकांमध्ये काही वेळ घबराट!

मलकापूर :   शनिवारी 14 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 वाजून 23 मिनिटांच्या सुमारास मलकापूर आणि नांदुरा तालुक्यातील विविध भागांत भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. सकाळची दैनंदिन कामे सुरू असतानाच अचानक घरातील वस्तू हलू लागल्या, जमिनीतून विचित्र आवाज ऐकू आले आणि काही क्षणांतच नागरिकांमध्ये घबराट पसरली. सुमारे चार सेकंद जाणवलेल्या या धक्क्यांमुळे नागरिकांनी तातडीने घराबाहेर धाव घेतली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झालेली नाही.

            मलकापूर शहरातील चाळीस बिघा, हनुमान नगर, हरिकिरण सोसायटी, माता महाकाली नगर आणि लक्ष्मी नगर परिसरासह अनेक भागांत नागरिकांना भूकंपाचा अनुभव आला. काही ठिकाणी घराबाहेर वाळत घातलेले कपडेही हलल्याचे नागरिकांनी सांगितले. या अचानक घडलेल्या प्रकारामुळे काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, नागरिकांनी समाजमाध्यमांवर आपले अनुभव मांडण्यास सुरुवात केल्याने भूकंप झाल्याची चर्चा सर्वत्र पसरली. ऑनलाइन भूकंपविषयक संकेतस्थळांनुसार, मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यातील भगवानपुरा तालुक्यातील सुखपुरी गाव परिसर या भूकंपाचे केंद्रस्थान असल्याचे दर्शविण्यात आले आहे. या भूकंपाचे सौम्य धक्के विदर्भाच्या प्रवेशद्वारासह खान्देशातील काही भागांतही जाणवले. मलकापूरचे तहसीलदार समाधान सोनवणे यांच्याशी संपर्क साधला असता, प्रशासनाला धक्के जाणवल्याची माहिती मिळाल्याचे त्यांनी सांगितले असून, कोणतीही हानी झाली नसल्याचे स्पष्ट केले आहे.

भुसावळसह पाच तालुक्यांतही भूकंपाचे धक्के

मध्य प्रदेशातील शिरवेल-धामनोदजवळ 4.5 रिश्टर तीव्रतेच्या भूकंपाचा केंद्रबिंदू होता. या भूकंपाचा परिणाम म्हणून भुसावळ शहरासह रावेर, मुक्ताईनगर, यावल आणि सावदा परिसरातील काही भागांत शनिवारी सकाळी 9 वाजून 15 मिनिटांच्या सुमारास 1 ते 3 सेकंद जमीन हादरली. साकेगाव येथेही सौम्य हादरे जाणवले. या धक्क्यांमुळे सीमावर्ती भागातील नागरिकांमध्येही काही वेळ भीतीचे वातावरण पसरले होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top