dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

बुलढाण्यात दहा दिवसांत १ हजार २४४ वाहनांची खरेदी | वाहन बाजारात ३ कोटी ८३ लाख रुपयांची उलाढाल

बुलढाणा :  दिवाळी आणि बलिप्रतिपदेच्या मुहूर्तावर मोठ्या प्रमाणात वाहनांची खरेदी केली जाते. त्यानुसार, यंदा बुलढाणा जिल्ह्यातील नागरिकांनी 1 ते 10 नोव्हेंबर अशा दहा दिवसीय कालावधीत तब्बल १ हजार २४४ वाहनांची खरेदी केली. 

बुलढाणा :  दिवाळी आणि बलिप्रतिपदेच्या मुहूर्तावर मोठ्या प्रमाणात वाहनांची खरेदी केली जाते. त्यानुसार, यंदा बुलढाणा जिल्ह्यातील नागरिकांनी 1 ते 10 नोव्हेंबर अशा दहा दिवसीय कालावधीत तब्बल १ हजार २४४ वाहनांची खरेदी केली. 

   उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील नोंदणीनुसार दुचाकी खरेदीला सर्वाधिक पसंती मिळाली आहे.  या खरेदीतून जिल्ह्याच्या वाहन बाजारात ३ कोटी ८३ लाख ७६ हजार ४९७ रुपयांची उलाढाल झाल्याची आकडेवारी सांगते. सणासुदीच्या काळात नवीन वाहन खरेदी करणे शुभ मानले जाते. यंदा बाजारपेठेत उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजन आणि पाडव्याच्या मुहूर्तावर वाहने घरी नेण्यासाठी नागरिकांनी नोंदणी केली होती. त्यामुळे बुलढाणा, खामगाव, शेगाव, मलकापूर सारख्या मोठ्या शहरांमधील अनेक शोरूममध्ये मोठी गर्दी उसळली होती. परिवहन विभागाच्या अधिकृत आकडेवारीनुसार, नोंदणी झालेल्या एकूण वाहनांमध्ये दुचाकींचे प्रमाण सर्वाधिक आहे. मध्यमवर्गीय कुटुंबांनी नवीन दुचाकी खरेदीला प्राधान्य दिले, तर अनेक कुटुंबांनी आपले चारचाकी वाहनाचे स्वप्न पूर्ण केले. याशिवाय शेतकरी आणि व्यावसायिकांनीही शेती व मालवाहतुकीसाठी नवीन वाहनांची खरेदी केली आहे.

दुष्काळामुळे कंपन्यांकडून आकर्षक योजना 

यावर्षी दुष्काळसदृश्य परिस्थिती असल्याने कंपन्यांनी आकर्षक सवलती, सुलभ कर्ज योजना दिल्या. त्यामुळे, यामुळे कोट्यवधींची उलाढाल झाली आहे. या विक्रमी नोंदणीमुळे परिवहन विभागाच्या महसुलातही मोठी भर पडली असून, स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळाली आहे.

अशी झाली खरेदी 

दुचाकी – ९७०

कार     – १८०

इतर  –  ९४ 

एकूण – १२४४

‘परिवहन विभागाला चांगला महसूल मिळाला आहे. ऑनलाइन प्रणालीमुळे वाहन नोंदणीची प्रक्रिया अधिक वेगवान आणि पारदर्शक झाली असल्याने नागरिकांना वेळेत कागदपत्रे मिळत आहेत.’ 

– अजय बिलावार, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी बुलढाणा 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top