dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

एक-दोन नव्हे, तब्बल २५ ते ३० वाहने एकमेकांवर आदळली : समृद्धी महामार्गावर विचित्र अपघात: तढेगावजवळील घटना

सिंदखेड राजा :  समृद्धी महामार्गावर विचित्र अपघाताची घटना समोर आली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यातील तढेगावजवळ खडकपूर्णा नदीवरील पुलावर तब्बल २५ ते ३० वाहने एकमेकांवर आदळल्याची धक्कादायक घटना घडली.

सिंदखेड राजा :  समृद्धी महामार्गावर विचित्र अपघाताची घटना समोर आली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यातील तढेगावजवळ खडकपूर्णा नदीवरील पुलावर तब्बल २५ ते ३० वाहने एकमेकांवर आदळल्याची धक्कादायक घटना घडली.

  प्राप्त माहितीनुसार, एका कंटेनरने अनेक वाहनांना धडक दिल्यानंतर महामार्गावर अक्षरशः वाहनांचा चेंदा झाला. या भीषण अपघातात जवळपास ३० जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.  जखमींचा अधिकृत आकडा अद्याप स्पष्ट झालेला नाही. अपघाताची भीषणता पाहता परिसरात एकच खळबळ उडाली आहे. प्राथमिक माहितीनुसार, समृद्धी महामार्गावरील खडकपूर्णा नदीच्या पुलावरून वाहने जात असताना एका कंटेनरने अनेक वाहनांना जोरदार धडक दिली. कंटेनर इतर वाहनांना घासत पुढे गेल्याने एकापाठोपाठ एक वाहने एकमेकांवर आदळली. काही क्षणांतच महामार्गावर अपघातग्रस्त वाहनांचा मोठा ढीग निर्माण झाल्यासारखी परिस्थिती झाली. अचानक घडलेल्या या घटनेमुळे वाहनचालकांमध्ये प्रचंड घबराट पसरली. अनेक वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे.

यंत्रणांची धावपळ!

घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि संबंधित आपत्कालीन यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्त वाहनांमधील जखमींना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य हाती घेण्यात आले. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले होते. काही जखमींची प्रकृती गंभीर असल्याची प्राथमिक माहिती आहे.

 अपघाताचे नेमके कारण अस्पष्ट

या भीषण अपघातामुळे समृद्धी महामार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला आहे. एकाच ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येने वाहने अपघातग्रस्त झाल्याने वाहतूक सुरळीत करण्याचे मोठे आव्हान यंत्रणांसमोर उभे ठाकले आहे. कंटेनरने वाहनांना धडक नेमकी कशामुळे दिली, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top