छत्रपती संभाजीनगर : शुल्लक कारणावरून झालेल्या वादा नंतर दारूच्या नशेत असलेल्या तीन उच्चशिक्षित तरुणांनी पालकमंत्री संजय शिरसाठ यांच्या घरावर हल्ला करून दगडफेक केली. या घटनेत दोन पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच सातारा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तीन संशयित तरुणांना ताब्यात घेतले आहे.

राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा समायोजित नगरचे पालकमंत्री संजय शिरसाठ यांचे सातारा परिसरात निवासस्थान आहे. गुरुवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास काही तरुण त्यांच्या बंगल्याच्या पाठीमागील मोकळ्या जागेवर मद्यपान करीत होते. त्यावेळी बंदोबस्तावर तैनात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी त्या तरुणांना हटकले असता त्या तरुणांनी पोलिसांसोबत वाद घातला, त्यानंतर तिन्ही तरुणांनी पोलिसांवर आणि पालकमंत्री संजय शिरसाठ यांच्या घरावर हल्ला करून दगडफेक केली. या दगडफेकीत दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती मिळतात सातारा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली.
दरम्यान, या घटनेनंतर पालकमंत्री संजय शिरसाठ यांनी मध्यरात्री बारा वाजेच्या सुमारास पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांच्यासह उपायुक्तांना आणि सहाय्यक पोलीस आयुक्तांना फोन केला असता त्यांचे फोन बंद येत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले . त्यानंतर संतप्त झालेल्या पालकमंत्री शिरसाठ यांनी थेट राज्याचे पोलीस महासंचालक यांना फोन करून या घटनेची माहिती दिली तसेच पोलीस आयुक्तांची आणि इतर अधिकाऱ्यांची तक्रार मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचे पालकमंत्री संजय शिरसाठ यांनी सांगितले.