dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

राज्यस्तरीय बांधिलकी मराठी साहित्य पुरस्कार – २०२७ चे आयोजन

अमरावती : मराठी साहित्याच्या विविध साहित्यप्रकारांना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच गुणवंत साहित्यिकांच्या सर्जनशीलतेचा सन्मान करण्याच्या उद्देशाने बांधिलकी प्रतिष्ठान, अमरावती यांच्या वतीने ‘राज्यस्तरीय बांधिलकी मराठी साहित्य पुरस्कार – २०२७’ आयोजित करण्यात आला आहे. या पुरस्कारासाठी राज्यातील साहित्यिकांनी आपल्या प्रकाशित साहित्यकृती पाठवाव्यात, असे आवाहन संस्थेच्या संस्थापक तथा संयोजिका ॲड. नीता प्रफुल्ल कचवे यांनी केले आहे.

१ ऑक्टोबर २०२५ ते ३१ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत प्रकाशित झालेल्या साहित्यकृती पुरस्कारासाठी पात्र ठरतील. राज्यस्तरीय पुरस्कारांमध्ये कादंबरी, बालसाहित्य, कथासंग्रह, कवितासंग्रह, समीक्षासंग्रह आणि ललित लेखसंग्रह या साहित्यप्रकारांचा समावेश आहे.

प्रत्येक राज्यस्तरीय पुरस्काराचे स्वरूप ११०० रुपये रोख, सन्मानपत्र, सन्मानचिन्ह व शाल असे आहे. या पुरस्कारांना अनुक्रमे वृषाली वानखडे, प्रफुल्ल ठाकरे, शंकर घोरसे, दिवाकर देशमुख, स्मिताताई बूल आणि शालिनी बेलसरे यांचे प्रायोजकत्व लाभले आहे.

याशिवाय जिल्हास्तरीय साहित्य पुरस्कारासाठी विविध साहित्यप्रकारांतील १० उत्कृष्ट साहित्यकृतींची निवड करण्यात येणार आहे. या पुरस्काराचे स्वरूप सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व शाल असे असून, मंदा नांदूरकर, छाया राऊत बर्वे आणि शारदा बरडे यांचे प्रायोजकत्व आहे.

पुरस्कारासाठी साहित्यकृती पाठविण्याची अंतिम तारीख २० नोव्हेंबर २०२६ आहे. संबंधित साहित्यकृतीच्या दोन प्रतींसह लेखकाचा अलीकडील फोटो व अल्पपरिचय पाठविणे आवश्यक आहे. पुरस्कारासाठी पाठविण्यात येणाऱ्या साहित्यकृतीला ISBN क्रमांक असणे तसेच ती प्रथमावृत्तीची असणे बंधनकारक आहे. परीक्षक मंडळाचा निर्णय अंतिम राहणार असून, पुरस्कारासाठी पाठविलेल्या साहित्यकृती परत केल्या जाणार नाहीत. पुरस्कार वितरण सोहळा बांधिलकी प्रतिष्ठानच्या आगामी साहित्य संमेलनात मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.  

मराठी साहित्याच्या समृद्ध परंपरेला नव्या प्रतिभेची जोड देण्यासाठी आणि गुणवंत साहित्यिकांच्या लेखणीला व्यासपीठ मिळवून देण्यासाठी साहित्यिकांनी आपापल्या साहित्यकृती आवर्जून पाठवाव्यात, असे आवाहन बांधिलकी प्रतिष्ठानच्या संस्थापक तथा संयोजिका ॲड. नीता प्रफुल्ल कचवे यांनी केले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top