मुंबई : प्रसिद्ध अभिनेते मुश्ताक खान यांचे निधन झाले आहे. ‘वेलकम’, ‘आशिकी’, रक्षक, मुझसे शादी करोगे आणि हम हैं राही प्यार के यांसारख्या लोकप्रिय चित्रपटांमधून आपल्या अभिनयाची छाप पाडणाऱ्या मुश्ताक खान यांनी वयाच्या ५६व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.

मुश्ताक खान गेल्या १५ दिवसांपासून मुंबईतील नानावटी रुग्णालयात दाखल होते. ते कर्करोगाशी झुंज देत होते. सुमारे पाच वर्षांपूर्वी त्यांना कर्करोगाचे निदान झाले होते. मात्र, अलीकडेच हा आजार पुन्हा बळावला होता. त्यानंतर त्यांची प्रकृती सातत्याने खालावत गेली. मुश्ताक खान यांचे व्यावसायिक भागीदार शिवम यांनी त्यांच्या निधनाची पुष्टी केली आहे.