dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

बलात्काऱ्यांचे समर्थन करणारे सरकार : अभिजित दिपके यांचा केंद्र सरकारवर आरोप 

छत्रपती संभाजीनगर :  दिल्लीतील विद्याथ आंदोलनानंतर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना हटविण्यात आले. यांच्या ठिकाणी प्रल्हाद जोशी यांना संधी दिली, मात्र ते विचित्र माणूस आहेत.  बलात्काऱ्यांचे स्वागत आणि कौतुक करणारे शिक्षणममंत्री आणि विद्यार्थ्यांवर नियोजनबध्द हल्ला करणारे सरकार बलात्काऱ्यांचे समर्थन करणोर आहे. असा हल्लाबोल करीत विद्याथ नेते अभिजित दिपके यांनी केंद्र सरकारवर अरोप केला. 

छत्रपती संभाजीनगर :  दिल्लीतील विद्याथ आंदोलनानंतर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना हटविण्यात आले. यांच्या ठिकाणी प्रल्हाद जोशी यांना संधी दिली, मात्र ते विचित्र माणूस आहेत.  बलात्काऱ्यांचे स्वागत आणि कौतुक करणारे शिक्षणममंत्री आणि विद्यार्थ्यांवर नियोजनबध्द हल्ला करणारे सरकार बलात्काऱ्यांचे समर्थन करणोर आहे. असा हल्लाबोल करीत विद्याथ नेते अभिजित दिपके यांनी केंद्र सरकारवर अरोप केला. 

नीट पेपर फुटीनंतर दिल्लीतील जंतर मंतर मैदानावर अभिजित दिपके यांच्या नेतृत्वात विद्यार्थ्यांनी महिनाभर आंदोलन केले. या आंदोलनाला यश आल्यानंतर भाजपा समर्थक आणि केंद्र सरकारमधील लोक विद्यार्थ्यांना टार्गेट करीत आहेत. योग गुरू रामदेव बाबा सुध्दा आता सरकारच्या समर्थनार्थ मैदानात उरले आहेत. या पार्श्वभूमिवर गुरूवार, 30 जुलै रोजी विद्याथ आंदोलनाचे नेतृत्व करणारे अभिजित दिपके यांनी छत्रपती संभाजीनगर येथील निवासस्थानी पत्रकार परिषद घेत केंद्र सरकार, भाजप आणि पोलिस प्रशासनावर गंभीर आरोप केले. विद्यार्थ्यांवरील लाठीमार, दगडफेक आणि पोलिसांच्या कारवाईबाबत पूर्वनियोजन करण्यात आल्याचा दावा करत त्यांनी या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली. 

अभिजीत दिपके म्हणाले,योग गुरू रामदेव बाबा यांच्यावरही दिपके यांनी निशाणा साधत रामदेव बाबांनी आमच्यावर बोलण्यापेक्षा त्यांच्या पतंजलीच्या उत्पादनांवर लक्ष द्यावे असा टोमणा मारला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांचा फोटो घेऊन चालणे, जय भीमचे नारे देणे आणि लोकशाहीसाठी रस्त्यावर उतरणे म्हणजे जर संस्कृती बदनाम करणे असेल, तर रामदेव बाबांना सांगा की होय, आम्ही संस्कृती बदनाम करतोय असे आव्हाण त्यांनी योग गुरूंना दिले. 

सर्वोच्च न्यायालयाने रामदेव बाबा यांच्या उत्पादनांवरून फसवणूक होत असल्याचे म्हटले आहे. देश आणि संस्कृती आम्ही झेन झी पिढी सांभाळून घेऊ, तुम्ही तुमच्या उत्पादनांकडे लक्ष द्या, नाहीतर ती बंद पडतील. तसेच, इथून पुढे शेतकरी आणि त्यांच्या नेत्यांना जेव्हा गरज पडेल, तेव्हा आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहू, अशी ग्वाही त्यांनी दिली.

बाहेरच्या फंडिंगची अफवा

आंदोलनांना बाहेरून फंडिंग येत असल्याच्या अफवा पसरविल्या जात ओहत. या आरोपांवर बोलताना दिपके यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनाच लक्ष्य केले. जर आम्हाला खरोखरच बाहेरून फंडिंग येत असेल, तर हे गृहमंत्री अमित शहांचे मोठे अपयश आहे आणि त्यासाठी त्यांनी त्वरित राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. तसेच 20 तारखेला विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जचे आदेशही अमित शहांचेच असतील, असा संशय त्यांनी व्यक्त केला.

सरकारकडून दगडफेकीचे नियोजन 

विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्ज संदर्भात दिपके यांनी पोलिसांच्या भूमिकेवर मोठे प्रश्नचिन्ह उभे केले. त्यांनी आरोप केला की, 19 तारखेच्या रात्री आणि 20 च्या सकाळी मी स्वतः पाहिले आहे की, पोलिसांनी दगडांनी भरलेला एक ट्रक आणि आधीच तुटलेली एक व्हॅन तिथे आणून ठेवली होती. दगडफेकीचे प्लॅनिंग पोलिस आणि भाजपने मिळून केले होते. याप्रकरणी आपण थेट डीसीपी यांची भेट घेऊन त्यांना जाब विचारल्याचेही ते म्हणाले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top