dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

समृद्धीवरील दरोड्याचा उलगडा; पाच जणांची आंतरजिल्हा टोळी जेरबंद 

कारंजा लाड : समृद्धी महामार्गावर प्रवाशाला तलवार व लोखंडी रॉडचा धाक दाखवून दरोडा टाकणाऱ्या पाच जणांच्या आंतरजिल्हा टोळीला जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखा, वाशिम आणि कारंजा शहर पोलिसांना मोठे यश आले आहे. आरोपींकडून चोरीतील रोख रक्कम, गुन्ह्यात वापरलेले वाहन, दोन बनावट पिस्तुले, लोखंडी रॉड आणि मोबाईल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

कारंजा लाड : समृद्धी महामार्गावर प्रवाशाला तलवार व लोखंडी रॉडचा धाक दाखवून दरोडा टाकणाऱ्या पाच जणांच्या आंतरजिल्हा टोळीला जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखा, वाशिम आणि कारंजा शहर पोलिसांना मोठे यश आले आहे. आरोपींकडून चोरीतील रोख रक्कम, गुन्ह्यात वापरलेले वाहन, दोन बनावट पिस्तुले, लोखंडी रॉड आणि मोबाईल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

याप्रकरणी बिहार राज्यातील पटणा जिल्ह्यातील बेलद रिटोला येथील रहिवासी व बँक व्यवस्थापक प्रशांत युधिष्ठिर रंजन (वय ३८) यांनी कारंजा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. ते  कारने रायपूरकडे जात असताना २७ जुलै रोजी पहाटे सुमारे ३ वाजता कारंजा लाड परिसरातील समृद्धी महामार्गावर थांबून विश्रांती घेत होते. त्यावेळी चार अनोळखी इसमांनी तलवार व लोखंडी रॉडचा धाक दाखवत त्यांच्याकडील ५ हजार रुपये रोख, सुमारे २ ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातले आणि इतर मिळून सुमारे १५ हजार रुपयांचा ऐवज लुटला. याप्रकरणी कारंजा शहर पोलीस ठाण्यात   गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे यांनी घटनास्थळी भेट देत स्थानिक गुन्हे शाखा व कारंजा शहर पोलिसांची संयुक्त पथके तयार करून तपासाचे आदेश दिले. गुप्त माहितीच्या आधारे हर्षद पांडुरंग साबळे (रा. चिखली, जि. बुलढाणा) याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने साथीदारांची नावे उघड केल्यानंतर चेतन संजय माने, ओम सुरेश सपकाळ, धनंजय उजालसिंग कमळीकर आणि गोपाल श्रीकिसन मोरे (सर्व रा. चिखली तालुका, जि. बुलढाणा) यांना अटक करण्यात आली. आरोपींकडून चोरीतील  ४,७५० रोख, गुन्ह्यात वापरलेली कार (एमएच-१४ डीएन-१२१३), लोखंडी रॉड, दोन बनावट पिस्तुले आणि पाच मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे, अपर पोलीस अधीक्षक लता फड, उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल क्षीरसागर व मनीष ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर आडे आणि कारंजा शहरचे पोलीस निरीक्षक अमर चोरे यांच्या पथकाने केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विशाल बोरकर करीत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top