dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

‘गण गण गणात बोते’च्या जयघोषात ‘श्रीं’च्या पालखीचे जिल्ह्यात स्वागत

मेडशी  : शेगावहून आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरकडे प्रस्थान करणाऱ्या श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचे शनिवारी सकाळी वाशिम जिल्ह्यात भक्तिभावाने आणि जल्लोषात स्वागत करण्यात आले. ‘गण गण गणात बोते’च्या अखंड जयघोषाने, टाळ-मृदुंगाच्या निनादाने आणि हरिनामाच्या गजराने मेडशी नगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली.

मेडशी येथे आगमन होताच श्री गजानन महाराजांच्या पालखीवर पुष्पवृष्टी

मेडशी  : शेगावहून आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरकडे प्रस्थान करणाऱ्या श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचे शनिवारी सकाळी वाशिम जिल्ह्यात भक्तिभावाने आणि जल्लोषात स्वागत करण्यात आले. ‘गण गण गणात बोते’च्या अखंड जयघोषाने, टाळ-मृदुंगाच्या निनादाने आणि हरिनामाच्या गजराने मेडशी नगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली.

यंदा पालखी सोहळ्याचे ५७ वे वर्ष असून अकोला, वाडेगाव व पातूर मार्गे सकाळी नऊ वाजता पालखीने वाशिम जिल्ह्यातील मेडशी येथे प्रवेश केला. जिल्ह्यात आगमन होताच विविध गावांमध्ये पालखीचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. महिला, युवक, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या भक्तिभावाने महाराजांचे दर्शन घेतले.  मेडशी येथे सर्वप्रथम हनुमानवाडी परिसरातील नागरिकांनी पालखीचे स्वागत केले. त्यानंतर शिवनेरी चौकात युवक व महिलांनी आकर्षक रांगोळ्या काढून, फटाक्यांची आतषबाजी करत आणि आरती ओवाळून ‘श्रीं’ना अभिवादन केले. गांधी चौक तसेच सिद्धिविनायक गणेश-वेटाळ परिसरातही भाविकांनी रांगोळ्या काढून व आरती करून पालखीचे स्वागत केले. पालखी गावात दाखल होताच टाळ-मृदुंगाचा गजर, हरिनामाचा जयघोष आणि कीर्तनाच्या स्वरांनी संपूर्ण परिसर भक्तिमय झाला. वनविभागाच्या प्रांगणात भाविकांसाठी बारी पद्धतीने दर्शनाची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच जिल्हा परिषद शाळेत वारकरी व भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था मेडशीकरांच्या वतीने करण्यात आली.

पोलीस, आरोग्य व महसूल विभागाचे नियोजन

श्री संत गजानन महाराज पालखीच्या वाशिम जिल्ह्यात आगमनानंतर मालेगाव पोलीस ठाणे व मेडशी पोलीस चौकीच्या वतीने कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पालखी मार्गावर सुरक्षेची विशेष काळजी घेण्यात आली. आरोग्य विभागाकडून वारकऱ्यांच्या आरोग्य तपासणी व आवश्यक वैद्यकीय सुविधांची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनीही पालखी सोहळ्याच्या नियोजनात सक्रिय सहभाग नोंदवून विविध व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी सहकार्य केले.

पालखी आगमनाने मेडशीला यात्रेचे स्वरूप

पालखी सोहळ्यासाठी पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी उपस्थिती लावल्याने गावाला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. आठवडी बाजारात खेळणी, खाद्यपदार्थ आणि विविध वस्तूंची दुकानेही सजली होती. भोजन व विश्रांतीनंतर पालखी ब्राह्मणवाडा, सुकांडा, कुरळा मार्गे डव्हा येथील मुक्कामासाठी रवाना झाली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top