dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

भूकंपाच्या तीव्र धक्क्यांनी जग हादरले : व्हेनेझुएलात 39 सेकंदांत भूकंपाचे 2 मोठे धक्के ; 10 हजार मृत्यूंची भीती

कराकस : जगातील दोन देशांमध्ये आलेल्या भूकंपाच्या तीव्र धक्क्यांनी लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. व्हेनेझुएलामध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे, जिथे अवघ्या एका मिनिटाच्या अंतराने 7.2 आणि 7.5 तीव्रतेचे दोन शक्तिशाली भूकंप आले. येथे भूकंपामुळे 10 हजार लोकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. 

कराकस : जगातील दोन देशांमध्ये आलेल्या भूकंपाच्या तीव्र धक्क्यांनी लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. व्हेनेझुएलामध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे, जिथे अवघ्या एका मिनिटाच्या अंतराने 7.2 आणि 7.5 तीव्रतेचे दोन शक्तिशाली भूकंप आले. येथे भूकंपामुळे 10 हजार लोकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. 

भूकंपाच्या धक्क्यांमुळे निवासी इमारतींपासून ते विमानतळापर्यंत सर्व काही कोसळले आहे. संपूर्ण देशात आणीबाणी लागू करण्यात आली आहे. व्हेनेझुएलाची राजधानी काराकसमध्ये लोक घाबरून घराबाहेर पळाले. येथील एक 22 मजली इमारत पूर्णपणे जमीनदोस्त झाली आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेले लोक आपल्या नातेवाईकांची नावे घेऊन हाक मारत आहेत. व्हेनेझुएलामध्ये मागील 100 वर्षांहून अधिक काळातील सर्वात शक्तिशाली भूकंपाचा धक्का असल्याचे म्हटले जात आहे.  

जपानमध्येही भूकंपाचे तीव्र धक्के

दुसरीकडे जपानमध्येही गुरुवारी 7.2 तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप आला. याचे धक्के शेकडो किलोमीटर दूर टोकियोपर्यंत जाणवले. अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही आणि त्सुनामीचा इशाराही जारी करण्यात आलेला नाही.

त्सुनामीचा अलर्ट

भूकंपाच्या भयानक धक्क्यांनी व्हेनेझुएला प्रचंड हादरले. अनेक राज्यांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आणि आणखी धक्के बसण्याच्या भीतीमुळे राजधानीतील नागरिक अजूनही घराबाहेरच आहेत. या भूकंपांनंतर, ‘यूएस पॅसिफिक त्सुनामी वॉर्निंग सेंटर’ने पोर्तो रिको आणि व्हर्जिन आयलंड्ससाठी त्सुनामीचा इशारा जारी केला आहे. भूकंपामुळे नागरिकांमध्ये प्रचंड दहशत पसरली आहे.

सर्व मदत करण्यास भारत सज्ज 

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पोस्ट केले आहे की, व्हेनेझुएलामध्ये झालेल्या तीव्र भूकंपामुळे झालेल्या विध्वंसामुळे मला अत्यंत दुःख झाले आहे. भारतीयांच्या वतीने, मी व्हेनेझुएलाचे सरकार आणि तिथल्या जनतेप्रती, आणि विशेषतः ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे त्या कुटुंबांप्रती माझ्या मनापासून संवेदना व्यक्त करतो. जखमींच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी आम्ही प्रार्थना करतो. या कठीण काळात बाधित झालेल्या सर्वांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. शक्य ती सर्व मदत करण्यास भारत सज्ज आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top