चेन्नई : तामिळनाडूमधील तिरुवल्लूर येथे एका कारखान्यामधील अमोनिया वायूची गळती होऊन सात जणांचा मृत्यू झाला आहे. तर या वायूची बाधा होऊन ७० हून अधिक कर्मचाऱ्यांची प्रकृती बिघडल्याचे सांगण्यात येत आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री विजय यांनी या दुर्घटनेबाबत दु:ख व्यक्त केले असून, घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

दुर्घटना घडली तेव्हा या कारखान्यात १०० हून अधिक कामगार काम करत होते. त्यामधील ७० जणांची प्रकृती एकाच वेळी बिघडली. तर उर्वरित कर्मचारी घाबरून कारखान्याबाहेर पळाले. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या कर्मचाऱ्यांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान, वायू गळतीमुळे बाधा झालेल्या कर्मचाऱ्यांच्या प्रकृतीवर डॉक्टरांचे एक पथक लक्ष ठेवून आहे.
घटनेच्या चौकशीसाठी समिती स्थापन
या दुर्घटनेबाबत प्रशासनाकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार या कारखान्यामध्ये कोळंबीवर प्रक्रिया करण्याचे काम केले जात असे. या दुर्घटनेनंतर कामगारांमध्ये शोकाकूल वातावरण आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री विजय यांनी या घटनेच्या चौकशीसाठी एक तीन सदस्यीय समिती स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. या समितीला २४ तासांत अंतरिम अहवाल आणि पुढील तीन दिवसांत अंतिम अहवाल सोपवण्याची सूचना देण्यात आली आहे.