dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

योगी आदित्यनाथ यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार; आठ मंत्र्यांचा शपथविधी

लखनऊ : उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारच्या मंत्रिमंडळाचा दुसरा विस्तार 10 मे रोजी दुपारी ३.३० वाजता ‘जन भवन’ येथे अत्यंत उत्साहात पार पडला. राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी आठ नवनियुक्त मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. 

या विस्तारामध्ये जुन्या जाणत्या चेहऱ्यांसह नव्या दमाच्या नेत्यांना संधी देऊन आगामी राजकीय आव्हाने पेलण्यासाठी भाजपने आपली रणनीती स्पष्ट केली आहे. या शपथविधी सोहळ्यात भूपेंद्र चौधरी आणि मनोज कुमार पांडेय यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. डॉ. सोमेंद्र तोमर आणि अजित पाल यांची पदोन्नती करण्यात आली असून त्यांनी राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) म्हणून शपथ घेतली. याशिवाय कृष्णा पासवान, कैलाश सिंह राजपूत, सुरेंद्र दिलेर आणि हंसराज विश्वकर्मा यांनी राज्यमंत्री म्हणून आपल्या कारकिर्दीची नवी इनिंग सुरू केली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top