dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

विहिर ढासळली : दोन मुलांसह वडिलांचा मृत्यू; सिल्लोड तालुक्यातील धानोरा येथील घटना

सिल्लोड :  विहिरीतील नादुरुस्त मोटार सुरु करुन कड्यावर पाणी मारण्यासाठी खाली उतरलेल्या बाप-लेकाच्या अंगावर मातीचा ढिगारा पडून झालेल्या अपघातात दोन मुलांसह वडिलांचा मृत्यू झाला. ही दुर्देवी घटना सिल्लोड तालुक्यातील धानोरा गावात शनिवार, 9 मे रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, वडील बाजीराव सर्जेराव काकडे (49 वर्ष), श्याम बाजीराव काकडे (22 वर्ष), अजिनाथ बाजीराव काकडे (26 वर्ष), सर्व रा.धानोरा, ता सिल्लोड अशी या दुर्घटनेत ठार झालेल्या बाप-लेकांची नावे आहेत. काकडे यांच्या शेतात गेल्या एक महिन्यापासून विहिरीचे खोदकाम सुरु आहे. जमिनी पासून ५० फूट खोल पर्यंत या विहिरीला खडक लागले नव्हते सर्व मातीच माती होती. परंतु, तिला पाणी चांगले असल्याने विहिरीला कडे टाकण्याचे काम सुरू होते. १४ कडे टाकण्यात आले होते. विहिरीतील पाण्याचा उपसा करण्यासाठी विहिरीत मोटार टाकण्यात आली होती. मात्र मोटार मध्ये बिघाड झाल्याने बिघाड कशामुळे झाला हे बघण्यासाठी दोरीच्या साहायाने तिन्ही बाप लेक शनिवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास विहिरीत उतरले होते. त्यावेळी अचानकरित्या विहिरीचे नवीन बांधलेले १४ कडे व २५ फूट मातीचा ढिगारा अचानक त्यांच्या अंगावर कोसळला. या घटनेत तिघे मातीच्या ढिगाराखाली दबले होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top