dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

अमरावती विभागात बुलढाणा बुलढाणा अव्वल; वाशिम तळाशी

अमरावती : फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (एसएससी) परीक्षेचा निकाल ८ मे रोजी जाहीर झाला. अमरावती विभागाचा एकूण निकाल ९०.५० टक्के लागला असून बुलढाणा जिल्ह्याने ९३.९५ टक्क्यांसह विभागात अव्वल स्थान पटकावले आहे. तर वाशिम जिल्ह्याचा निकाल ८८.०४ टक्के लागून विभागात सर्वात कमी निकालाची नोंद झाली.

१ लाख ४४ हजारांहून अधिक विद्यार्थी उत्तीर्ण

अमरावती : फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (एसएससी) परीक्षेचा निकाल ८ मे रोजी जाहीर झाला. अमरावती विभागाचा एकूण निकाल ९०.५० टक्के लागला असून बुलढाणा जिल्ह्याने ९३.९५ टक्क्यांसह विभागात अव्वल स्थान पटकावले आहे. तर वाशिम जिल्ह्याचा निकाल ८८.०४ टक्के लागून विभागात सर्वात कमी निकालाची नोंद झाली.

विभागातील एकूण १ लाख ६१ हजार ७१९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १ लाख ६० हजार ३७ विद्यार्थी परीक्षेला बसले. त्यामधून १ लाख ४४ हजार ८३५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. जिल्हानिहाय निकालात बुलढाणा ९३.९५ टक्क्यांसह प्रथम, अकोला ९०.७४ टक्क्यांसह दुसऱ्या, अमरावती ९०.०६ टक्क्यांसह तिसऱ्या, यवतमाळ ८८.३८ टक्क्यांसह चौथ्या तर वाशिम ८८.०४ टक्क्यांसह पाचव्या स्थानावर राहिला. दरम्यान, खासगी विद्यार्थ्यांचा विभागीय निकाल ७९.५८ टक्के लागला असून पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांचा निकाल केवळ ३८.४१ टक्के लागल्याचे स्पष्ट झाले आहे

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top