जालना : भोकरदन तालुक्यातील पारध पोलीस ठाणे हद्दीत एका तरुणीचे अश्लील फोटो काढून तिला धमकावत धर्मांतरासाठी दबाव टाकल्याचा आणि वारंवार अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

पारध पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा; दोघांना पोलीस कोठडी
जालना : भोकरदन तालुक्यातील पारध पोलीस ठाणे हद्दीत एका तरुणीचे अश्लील फोटो काढून तिला धमकावत धर्मांतरासाठी दबाव टाकल्याचा आणि वारंवार अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पारध पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून चौघांनाही अटक करण्यात आली आहे.
याबाबत पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी शेख इम्रान शेख हबीब ( रा. वालसावंगी ) याने तिचे अश्लील फोटो काढले आणि ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार केले. तसेच नमाज पढण्यास भाग पाडणे, बुरखा परिधान करण्यासाठी दबाव टाकणे अशा प्रकारे तिच्यावर मानसिक व शारीरिक छळ करत धर्मांतरासाठी भाग पाडण्याचा प्रयत्न केल्याचे तक्रारीत नमूद आहे.
याशिवाय आरोपीने तरुणीला विविध ठिकाणी नेऊन तिचा गैरफायदा घेतल्याचेही समोर आले आहे. या प्रकरणात पीडितेने धैर्याने पुढे येत पारध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत मुख्य आरोपीसह त्याच्या कुटुंबातील त्याचा भाऊ
शेख जुबेर शेख हबीब, शेख हबीब, शेख बानो अशा चार जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.
दरम्यान, मुख्य आरोपी शेख इम्रान आणि त्याच्या भावाला अटक करण्यात आली असून इतर संशयितांचा शोध सुरू आहे. या घटनेचा तपास सखोलपणे सुरू असून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असा विश्वास पोलीस प्रशासनाने व्यक्त केला आहे.
या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून समाजात वाढत्या विकृत प्रवृत्तींबाबत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांनी अशा घटनांविरोधात सजग राहून पीडितांना पाठिंबा देण्याची गरज व्यक्त होत आहे.
पाच दिवसांची कोठडी
या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या शेख इम्रान आणि शेख जुबेर या दोघांना बुधवार, 4 में रोजी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली, अशी माहिती पारध पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष माने यांनी दिली.


