dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

मनपाच्या पहिल्या सर्वसाधारण सभेत गदारोळ: शिवसेना, एमआयएमचे नगरसेवक आक्रमक | Uproar at Municipal Corporation’s First General Body Meeting

छत्रपती संभाजीनगर :  महानगरपालिकेच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत शुक्रवार, 27 मार्च रोजी गदारोळ पाहण्यास मिळाला. तब्बल सहा ते सात वर्षानंतर झालेल्या मनपाच्या सभेत शिवसेना (उबाठा) पक्षाचे आणि एमआयएमचे नगरसेवक चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसून आले.

छत्रपती संभाजीनगर :  महानगरपालिकेच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत शुक्रवार, 27 मार्च रोजी गदारोळ पाहण्यास मिळाला. तब्बल सहा ते सात वर्षानंतर झालेल्या मनपाच्या सभेत शिवसेना (उबाठा) पक्षाचे आणि एमआयएमचे नगरसेवक चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसून आले. शिवसेना (उबाठा) पक्षाच्या नेत्यांनी महापौरांसमोरील राजदंड पळविण्याचा प्रयत्न केला. महापौर समीर राजूरकर यांनी शिवसेनेच्या सर्व सहा सदस्यांना सभागृहाबाहेर काढण्याचे आदेश सुरक्षा रक्षकांना दिल्याने राडा झाल्याचे पहायला मिळाले.

महापौर समीर राजूरकर यांच्या अध्यक्षतेखाली उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांचया उपस्थितीत महापालिकेची पहिली सर्वसाधारण सभा शुक्रवारी सकाळी अकरा वाजता सुरु झाली. सभा सुरु होताच शिवसेना (उबाठा) पक्षाचे नगरसेवक सचिन खैरे यांनी नवीन पाणीपुरवठा याजनेचे श्रेय माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे असून त्यांचया कार्यकाळात ही योजना सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला असून विद्यमान सरकारने याचे श्रेय घेऊ नये, तसेच उध्दव ठाकरे यांच्या अभिनंदनाचा ठराव सभागृहात घ्यावा अशी मागणी करताच सभागृहात एकच गोंधळ उडाला. महापौर समीर राजूरकर या मागणीकडे दुर्लक्ष करीत असल्याचे निदर्शनास येताच सचिन खैरे, माजी महापौर रशीद खान मामू, गटनेते गणेश लोखंडे, नगरसेविका सावित्री वाणी यांनी राजदंड पळविण्याचा प्रयत्न केला. महापौरांनी गोंधळ घालणाऱ्या नगरसेवकांना बाहेर काढण्याचे आदेश देताच काही काळ सुरक्षारक्षक आणि नगरसेवकांमध्ये धक्काबुक्की झाली.

दरम्यान, एमआयएमच्या नगरसेवकांनी शहराच्या नामांतरावरुन सभागृहात गोंधळ करत जोरदार घोषणाबाजी केली. एमआयएमच्या सर्व नगरसेवकांनी प्रशासनावर हिटलरशाहीचा आरोप करत सभागृहातून सभात्याग केला. विरोधी पक्षनेते समीर साजिद बिल्डर यांनी प्रशासनाच्या निर्णयावर आक्षेप घेत, औरंगाबादचे नामांतर छत्रपती संभाजीनगर करण्यात आले. लोकप्रतिनिधी निवडण्यासाठी मतदान घेतले जाते. त्याचप्रमाणे शहराच्या अस्मितेशी जोडलेल्या नामांतराच्या विषयावरही जनतेचे मत जाणून घ्यायला हवे होते. मुंबईत बसून दोन अधिकाऱ्यांनी घेतलेला निर्णय शहरावर लादण्यात आला हि सरळ सरळ हिटलरशाही म्हणत सभात्याग केला. शिवसेना (उबाठा) व एमआयएमच्या सदस्यांनी पहिल्याच सर्वसाधारण सभेत सभागृह दणाणून सोडले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top