खामगाव : मित्रांसह येथील जनुना तलावामध्ये पोहण्यासाठी गेलेल्या एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना 21 मार्च रोजी दुपारी उघडकीस आली. मोहम्मद अरसलम मोहम्मद नईम (17) रा. बर्डे प्लॉट असे मृतकाचे नाव आहे.

रमजान ईद निमित्त सर्वत्र ईद साजरी होत असताना शहरातील बर्डे प्लॉट भागातील मोहम्मद अरसलम मोहम्मद नईम हा अल्पवयीन युवक त्याच्या मित्रांसह शहरापासून जवळच असलेल्या जनुना तलाव येथे पोहण्यासाठी गेला असता पाण्याचा अंदाज चुकल्याने तो तलावामध्ये बुडाला. यावेळी त्याच्यासोबत असलेले मित्र सर्व घाबरून आरडाओरड करून नागरिकांना त्यांनी माहिती दिली. सदर अल्पवयीन युवक पाण्यात बुडाल्याची माहिती बर्डे प्लॉट भागात वाऱ्यासारखी पसरली यावेळी घटनास्थळी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी एकच गर्दी केली होती. घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार आणि पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. यावेळी पोलिसांनी तातडीने एनडीआरएफचे पथक बोलावून बुडालेल्या युवकाचा शोध घेतला असता काही वेळातच त्याचा मृतदेह तरंगत पाण्यावर आला. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून मोहम्मद अरसलम मोहम्मद नईम याच्या दुर्दैवी मृत्यूने बर्डे प्लॉट भागात एकच हळहळ व्यक्त होत आहे.