dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

दिवसाढवळ्या मंदिरात चोरी; ३ चोरटे सीसीटीव्हीत कैद

वाशिम :  शहरातील लाखाळा येथील संत गजानन महाराज मंदिरात दिवसाढवळ्या दानपेटी फोडून चोरी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे भाविकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

वाशिम :  शहरातील लाखाळा येथील संत गजानन महाराज मंदिरात दिवसाढवळ्या दानपेटी फोडून चोरी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे भाविकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, १० मार्च रोजी सकाळी सुमारे ११ वाजून ५ मिनिटांच्या सुमारास तीन अज्ञात युवक मंदिर परिसरात आले. त्यांनी मंदिरातील दानपेटी फोडून सुमारे ५० हजार रुपयांहून अधिक रक्कम लंपास केली.  विशेष म्हणजे ही संपूर्ण घटना मंदिर परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. फुटेजमध्ये तीन तरुण सायकलवर येताना दिसत असून त्यांनीच चोरी केल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपास सुरू केला असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध घेण्यात येत आहे. मंदिरासारख्या पवित्र ठिकाणी दिवसाढवळ्या झालेल्या या चोरीमुळे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top