लांडग्याच्या हल्ल्यात दोन बकऱ्या आणि सहा बोकड ठार; चिखली तालुक्यातील भरोसा येथील घटना.. 

चिखली :  मध्यरात्री गोठ्यात  प्रवेश करत दोन बकऱ्या आणि सहा बोकडांचा लांडग्याने फडशा पाडला. चिखली तालुक्यातील भरोसा शिवारात ९  फेब्रुवारीच्या रात्री दीड वाजेच्या सुमारास ही घटना घडली. 

अंकुश पाटील/ चिखली :  मध्यरात्री गोठ्यात  प्रवेश करत दोन बकऱ्या आणि सहा बोकडांचा लांडग्याने फडशा पाडला. चिखली तालुक्यातील भरोसा शिवारात ९  फेब्रुवारीच्या रात्री दीड वाजेच्या सुमारास ही घटना घडली.  यामुळे, अल्पभूधारक शेतकऱ्याचे एक लाख 40 हजाराचे रुपयांचे नुकसान झाले  आहे.

भरोसा येथील शेतकरी  समाधान ज्ञानबा थुटटे यांचे भरोसा गावाला लागुन अंचरवाडी  गोठा आहे़.  शेतीला जोडधंदा म्हणून ते शेळी पालनाचा व्यवसाय करतात.  त्यांनी आपल्या शेतातील गोठ्यात बकऱ्या आणि बोकड  बांधले होते. दरम्यान 9 फेब्रुवारी रोजी रात्री  लांडग्यांनी त्यांच्या कोठ्यावर अचानक हल्ला करून दोन बकऱ्या  व सहा बोकड ठार केले.  

घटनेची माहिती मिळताच   पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर विश्वास वानखेडे, वनरक्षक गजानन पोटे , वनपाल प्रदिप मुंढे भरोसा  भाग 1चे तलाठी मगर  यांना फोन करून कळविले. याप्रकरणी वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता ते म्हणाले,   सदर घटनेची तक्रार ऑनलाइन आणि ऑफलाइन  ऑफिसला दया आम्ही शेतकरी यांना वाऱ्यावर सोडणार नाही वन्यप्राण्यापासून झालेल्या नुकसानीचा मोबदला वनविभागा मार्फत देण्यात येतो त्यासाठी रीतसर अर्ज सादर करावा लागेल अशी, माहीती वनविभागाचे वनरक्षक गजानन पोटे यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »