मुंबई : रणजी ट्रॉफी २०२५-२६ च्या क्वार्टर फायनलमध्ये कर्नाटक क्रिकेट संघाने ४२ वेळा विजेत्या मुंबईला चार विकेट्सने हरवून उपांत्य फेरीत प्रवेश केला. केएल राहुल सामन्याचा हिरो ठरला, त्याने दबावाखाली शानदार शतक झळकावले आणि संघाला संस्मरणीय विजय मिळवून दिला. केएल राहुलचे २४वे प्रथम श्रेणी तर नववे रणजी ट्रॉफी शतक होते. या पराभवासह यंदाच्या हंगामात मुंबईचे आव्हान संपुष्टात आले.

सामना जिंकण्यासाठी कर्नाटकसमोर विजयासाठी ३२५ धावांचे आव्हान होत, परंतु केएल राहुलने जबरदस्त फलंदाजी केली, त्याने १८२ चेंडूत १३० धावांची शानदार खेळी करत एक टोक टिकवून ठेवले आणि प्रथम श्रेणी क्रिकेटमधील त्याचे २४वे शतक केले. या शतकाने सामन्याचा मार्गच बदलला नाही, तर मुंबईच्या आशाही धुळीस मिळाल्या. राहुलला स्मरन रविचंद्रनकडून उत्कृष्ट साथ मिळाली. स्मरनने नाबाद ८३ धावा करुन संघाला लक्ष्य मिळवून दिले. कठीण परिस्थितीत त्याने संयमी फलंदाजी केली. दोघांमधील १४७ धावांच्या भागीदारीने कर्नाटकचा विजय जवळजवळ निश्चित केला. केएल राहुल बाद झाल्यानंतर, स्मरन रविचंद्रनने जबाबदारी स्वीकारली आणि नाबाद ८३ धावा करत संघाला विजयाकडे नेले.
केएल राहुलचे दमदार शतक
केएल राहुल या सामन्याच्या पहिल्या डावात फार काही करु शकला नाही आणि २८ धावांवर बाद झाला, परंतु तरीही, कर्नाटकने ५३ धावांची महत्त्वाची आघाडी मिळवली. दुसऱ्या डावात, राहुलने पूर्णपणे वेगळ्या शैलीत फलंदाजी केली आणि त्याच्या अनुभवाचा पुरेपूर फायदा घेतला. शतक पूर्ण केल्यानंतरही, त्याने जास्त आनंद साजरा केला नाही आणि संघाला विजयाकडे नेण्यावर पूर्णपणे लक्ष केंद्रित केले. या विजयासह, कर्नाटकने उपांत्य फेरीत स्थान निश्चित केले आहे. आता, कर्नाटक संघ १५ ते १९ फेब्रुवारी दरम्यान अंतिम फेरीत पोहोचण्याच्या उद्देशाने बेंगळुरुमध्ये उत्तराखंडविरुद्ध मैदानात उतरेल.