मुंबई : भारताने टी-२० विश्वचषकाची सुरुवात विजयाने केली आहे. शनिवारी झालेल्या शेवटच्या सामन्यात संघाने अमेरिकेचा २९ धावांनी पराभव केला. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात भारताने नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ९ गडी बाद १६२ धावा केल्या. टीम इंडियाचे पहिले ४ गडी अवघ्या ४६ धावांत बाद झाले. कर्णधार सूर्यकुमार यादवने ४९ चेंडूत ८४ धावा करत संघाला सन्मानजनक धावसंख्या गाठून दिली.

टीम इंडियाची फलंदाजी फार काही चांगली राहिली नाही. तरी सूर्यकुमार यादवच्या खेळीमुळे टीम इंडियाने 161 धावांवर मजल मारली होती. या धावांचा पाठलाग करताना अमेरिकेने 8 गडी गमवून 132 धावा केल्या. भारताने हा सामना 29 धावांनी जिंकला. या सामन्याचा विजयाचा शिल्पकार ठरला तो कर्णधार सूर्यकुमार यादव.. एकीकडे विकेट धडाधड पडत असताना शेवटपर्यंत उभा राहून त्याने सामना जिंकवण्यात मोलाचा हातभार लावला.