dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

बुलढाण्यात दिवसाढवळ्या घरफोडी! सोन्या चांदीचे दागिने, कॅश; १ लाख ९१ हजारांचा मुद्देमाल लंपास

बुलढाणा : शहरात चोरट्यांची हिम्मत वाढल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आहे. दिवसाढवळ्या दुपारच्या वेळी घरफोडी करत सोन्या चांदीचे दागिने व रोकड असा १ लाख ९१ हजारांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना मलकापूर रोड वरील चोपडा शोरूम मागील एका ठिकाणी घडली. 

सचिन शंकर शिल्लारकर  (35 वर्ष) यांनी प्रकरणाची तक्रार शहर पोलीसात दिली.  त्यानुसार, शिल्लारकर हे चहाच्या हॉटेलचा  व्यवसाय करतात. शहराची हद्द सुरू होणाऱ्या पहिल्याच प्रभागात चोपडा शोरुममागे त्यांचे घर आहे. नित्य नियमितपणाने ३ जानेवारीला ते कामासाठी आपल्या हॉटेलात गेले होते. दरम्यान, दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घरातील इतर सदस्य देखील नातेवाईकाकडे एका  कार्यक्रमानिमित्त गेले होते. मात्र, घरी परतल्यानंतर घराचे कुलूप तुटलेल्या अवस्थेत दिसून आल्याने त्यांना मोठा धक्काच बसला. कपाटातील लॉकर बघितले असता 

 ५१ हजार किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने, १ लाख ४० हजारांची रोकड असा एकूण १ लाख ९१ हजारांचा मुद्देमाल लंपास केल्याचे उघडकीस आले. घरी कुणी नसल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी घरफोडीचे धाडस केले, असे तक्रारीत नमूद करण्यात आले असून प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रवी मोरे हे करीत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top