dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

विद्युत धक्क्याने सेवानिवृत्त कर्मचाऱ्याचा मृत्यू

अंढेरा : बांधकामावर पाणी मारत असताना घरासमोरून जाणाऱ्या  विद्युत प्रवाहित तारेचा स्पर्श होऊन जोरदार विद्युत धक्क्याने  तिसऱ्या मजल्यावरून खाली कोसळून एका सेवानिवृत्त कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची  घटना शनिवारी सकाळी घडली.

अंढेरा : बांधकामावर पाणी मारत असताना घरासमोरून जाणाऱ्या  विद्युत प्रवाहित तारेचा स्पर्श होऊन जोरदार विद्युत धक्क्याने  तिसऱ्या मजल्यावरून खाली कोसळून एका सेवानिवृत्त कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची  घटना शनिवारी सकाळी घडली. या घटनेमुळे देऊळगाव मही परिसरात शोककळा पसरली आहे. संतोष गंगाराम आरमाळ वय 62, रा. शिवणी आरमाळ असे आहे. ते कै. लक्ष्मीबाई माध्यमिक आश्रम शाळा, शिवणी आरमाळ येथे प्रयोगशाळा परिचर म्हणून कार्यरत होते. काही महिन्यांपूर्वीच ते सेवानिवृत्त झाले होते.

    देऊळगाव मही येथील छत्रपती चौक परिसरात संतोष आरमाळ यांच्या मालकीच्या  जागेवर घराचे बांधकाम सुरू आहे. ते नेहमीप्रमाणे शनिवारी सकाळी घराच्या तिसऱ्या मजल्यावरील स्लॅबवर पाणी मारण्यासाठी गेले होते. यावेळी नकळतपणे घरासमोरून जाणाऱ्या उच्चदाब विद्युत तारेचा त्यांना जबर विद्युत शॉक बसला. शॉक इतका तीव्र होता की संतोष आरमाळ यांचा तोल जाऊन ते थेट तिसऱ्या मजल्यावरून खाली कोसळले.

घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी तात्काळ धाव घेत आरमाळ यांना गंभीर अवस्थेत देऊळगाव मही ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी जालना येथे हलविण्याचा सल्ला देण्यात आला. त्यानुसार त्यांना जालना येथील कलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
Scroll to Top