dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

राज्यात तीन दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर: मुख्यमंत्र्यांची घोषणा |अजित पवारांच्या निधनामुळे महाराष्ट्रावर शोककळा : आज शासकीय सुट्टी जाहीर

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे संपूर्ण देशात हळहळ व्यक्त होत असून राज्यात गुरूवारी शासकीय सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे तीन दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

Ajit Pawar

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे संपूर्ण देशात हळहळ व्यक्त होत असून राज्यात गुरूवारी शासकीय सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे तीन दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

अजित पवार यांच्या निधनामुळे एक दमदार आणि दिलदार मित्र गमावल्याची भावना फडणवीस यांनी व्यक्त केली. पवार यांचे निधन ही अतिशय दुःखद घटना आहे. अतिशय अनाकलनीय अशा परिस्थितीमध्ये विमान अपघातामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचा दुःखद निधन झाल्याची वार्ता सर्वांना मिळाली आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शोककाळा पसरली. अजितदादा पवार महाराष्ट्रातले एक लोकनेते होते आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्याची माहिती असलेला, महाराष्ट्राच्या प्रश्नांची जाण असलेला अशा प्रकारचा हा नेता होता, ज्यांच्याबद्दल जनसामान्यांमध्ये प्रचंड मोठी आस्था होती. अजित दादा एक अतिशय संघर्षशील अशा प्रकारचे नेतृत्व होते आणि सर्व परिस्थितीमध्ये न डगमगता पुढे जाणारे अशा प्रकारचे व्यक्तिमत्व होते. महाराष्ट्राकरिता आजचा दिवस हा अतिशय कठीण दिवस आहे. कारण अशा प्रकारचे नेतृत्व तयार व्हायला अनेक वर्ष लागतात आणि ज्यावेळी महाराष्ट्राच्या विकासामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण योगदान ते देत होते, अशा काळामध्ये त्यांचे निघून जाणे हे अविश्वसनीय आहे. मनाला चटका लावणारे असल्याचे फडणवीस म्हणाले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
Scroll to Top