dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

पोटात चाकू भोसकून तरुणाची निर्घृण हत्या; अंबड तालुक्यातील पारनेर फाटा परिसर हादरला

अंबड : पोटात धारदार चाकूने भोसकून एकाने अठरा वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या केल्याची खळबळजनक घटना तालुक्यातील पारनेर फाट्याजवळ घडली. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात भीती व संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. पवन संतोष बोराटे (१८) असे या घटनेतील मृतकाचे नाव आहे. याप्रकरणी अंबड पोलिसांनी रविवारी गुन्हा दाखल केला आहे.

अंबड : पोटात धारदार चाकूने भोसकून एकाने अठरा वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या केल्याची खळबळजनक घटना तालुक्यातील पारनेर फाट्याजवळ घडली. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात भीती व संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. पवन संतोष बोराटे (१८) असे या घटनेतील मयताचे नाव आहे. याप्रकरणी अंबड पोलिसांनी रविवारी गुन्हा दाखल केला आहे.

घटनेबाबत पोलिसांनी सांगितले की, मृतक पवन बोराटे याने आरोपीच्या बहिणीला एक चिठ्ठी दिली होती. या कारणावरून

शनिवार, 24 जानेवारी रोजी रात्री पारनेर फाटा परिसरात दोघांमध्ये वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्यानंतर संतप्त झालेल्या संशयित आरोपी राहुल खरे याने टोकाचे पाऊल उचलत सोबत आणलेल्या धारदार चाकने पवन भोसकले. या चाकू हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या पवनला परिसरातील नागरिक व कुटुंबियांनी तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी मयताचे वडील संतोष बोराटे यांच्या तक्रारीवरून अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी राहुल खरे याला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे. या दुर्दैवी घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मयताच्या नातेवाईकांनी आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top