dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

बनोटी येथे सिकलसेल आजाराबाबत जनजागृती

वरठाण : सोयगाव तालुक्यातील बनोटी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सिकलसेल आजाराच्या निर्मुलनासाठी अरुणोदय जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत महिलांची आरोग्य तपासणी करुन त्यांना सिकलसेल आजाराबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे.

वरठाण : सोयगाव तालुक्यातील बनोटी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सिकलसेल आजाराच्या निर्मुलनासाठी अरुणोदय जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत महिलांची आरोग्य तपासणी करुन त्यांना सिकलसेल आजाराबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे.

सिकलसेल हा अनुवांशिक आजार असून त्याचे वेळीच निदान होणे आवश्यक आहे. बनोटी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या जनजागृती अभियानात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गितेश चावडा यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य अधिकारी डॉ. सोनम डव्हळे, डॉ. मकरंद जोशी, डॉ. गणेश शिंदे हे रुग्णांची मोफत सोल्युबिलीटी, इलेक्ट्रोफोरासीस आणि एचपीएलसी तपासणी करुन औषधोपचार देत आहेत. बनोटी प्राथमिक आरोग्य केंद्राअंर्तगत गोंदेगाव, किन्ही, हनुमंतखेडा, वडगाव, नांदगाव, पहुरी, निंभोरा आदी गावात मोहीम राबविण्यात येत आहे.  ७ फेब्रुवारी पर्यंत अरुणोदय जनजागृती अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गितेश चावडा यांनी दिली. दरम्यान, सिकलसेल हा अनुवंशीक आजार असून सिकलसेलग्रस्त रुग्णांना शासनस्तरावर संजय निराधार योजनेचा लाभ, एसटी प्रवासात सवलत, विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी अतिरिक्त वेळ मिळतो असे देखील तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गितेश चावडा यांनी सांगितले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top