शिरपूर जैन : ‘ओम पुण्याहं, पुण्याहं, ओम प्रियंताम प्रियंताम’च्या भक्तिमय गजरात शिरपूर जैन येथील जगप्रसिद्ध श्री अंतरिक्ष पार्श्वनाथ मंदिराचा ९४१ वा वार्षिकोत्सव २३ जानेवारी रोजी सकाळी १०.३० वाजता मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

या वेळी श्री अंतरिक्ष पार्श्वनाथ महाराज मंदिरात सत्तरभेदी पूजेनंतर रजत ध्वजदंडाचे विधिवत अष्टकारी पूजन करून ध्वजारोहण करण्यात आले. या धार्मिक सोहळ्यास आचार्य विमलहंस सुरिश्वरजी महाराज यांच्यासह मुनीराज रत्नवल्लभ विजयजी महाराज, महासती सौम्यप्रज्ञाश्रीजी यांच्यासह साधू-साध्वींची तसेच श्वेतांबर जैन समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. जमिनीपासून अधर असलेल्या या पुरातन मंदिराच्या वार्षिकोत्सवाची सुरुवात दिल्ली येथील लाभार्थी कुटुंबाच्या हस्ते पूजनाने करण्यात आली. अकोला येथील विधीकारांनी संगीतमय पूजेचे सादरीकरण केले. याप्रसंगी आचार्य विमलहंस सुरिश्वरजी महाराज यांचे मंगलपाठ व शांतिपूजन संपन्न झाले. ध्वजारोहणानिमित्त १०८ मंगल दिव्यांची आरती करण्यात आली.कार्यक्रमात संस्थांनचे विश्वस्त पारसमल गोलेच्छा,किशोर सोनी,अतिश शाह यांच्यासह संस्थांनचे व्यवस्थापक बाबुराव बोराटे,अशोक भन्साली,निर्भय कोठारी तसेच मालेगाव, बाळापूर अकोला व परिसरातील श्वेतांबर समाज बांधव उपस्थित होते.