dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

विरोधक एकत्र, सत्तेचे गणित जुळले; भाजप–उद्धवसेनेचे सभापती बिनविरोध

वाशिम : नगरपरिषद निवडणुकीनंतर सत्तास्थापनेसाठी परस्परविरोधी मानले जाणारे दोन प्रमुख पक्ष—भाजप आणि उद्धवसेना—एकत्र आल्याचे चित्र वाशिममध्ये पाहावयास मिळाले. उपाध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध झाल्यानंतर सभापतीपदाच्या निवडीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र सत्तेसाठी व्यवस्थीत आणि परिपक्व पद्धतीने झालेल्या वाटाघाटींमुळे नगरपरिषदेत सर्व सभापतींची निवड बिनविरोध पार पडली. विशेष म्हणजे सर्व सभापतीपदे भाजप व उद्धवसेनेकडे गेली असून, महत्त्वाची तीन सभापतीपदे भाजपच्या वाट्याला आली आहेत.

स्थायी समिती व विविध विषय समित्यांची निवड करण्यासाठी मंगळवार, २० जानेवारी रोजी नगरपरिषदेत विशेष सभा घेण्यात आली. या सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष अनिल केंदळे होते. सभेला उपाध्यक्ष राजू भांदुर्गे, उपजिल्हाधिकारी विरेंद्र जाधव, मुख्याधिकारी निलेश गायकवाड यांच्यासह नगरसेवकांची मोठी उपस्थिती होती.  सकाळी १२ ते दुपारी २ या वेळेत सभापतीपदासाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया पार पडली. त्यानंतर छाननी पूर्ण झाल्यावर दुपारी ३ वाजता मुख्य सभा घेण्यात आली. कोणत्याही सभापतीपदासाठी प्रतिस्पर्धी अर्ज दाखल न झाल्याने सर्व सभापतींची निवडणूक बिनविरोध झाल्याची अधिकृत घोषणा उपजिल्हाधिकारी विरेंद्र जाधव व मुख्याधिकारी निलेश गायकवाड यांनी केली.  नगरपरिषद बांधकाम समितीच्या सभापतीपदी भाजपचे राहुल तुपसांडे यांची निवड झाली. शिक्षण समितीच्या सभापतीपदी भाजपचे कुणाल हेडा, तर नियोजन समितीच्या सभापतीपदी अरुणा वाटाणे यांची वर्णी लागली. ही तीनही महत्त्वाची सभापतीपदे भाजपकडे गेली आहेत.  उद्धवसेनेच्या वाट्याला पाणीपुरवठा, महिला व बालकल्याण तसेच आरोग्य ही खाती आली आहेत. पाणीपुरवठा समितीच्या सभापतीपदी वर्षा हजारे, महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी गोकुळबाई इंगोले, तर आरोग्य समितीच्या सभापतीपदी उपाध्यक्ष राजू भांदुर्गे  यांच्याकडे आहे. याशिवाय महिला व बालकल्याण समितीच्या उपसभापतीपदी उद्धवसेनेच्या पूजा काळे यांची नियुक्ती करण्यात आली.  स्थायी समितीच्या सदस्यपदी भाजपचे अनिल ताजणे, जयश्री वानखेडे तसेच उद्धवसेनेचे मिर्झा साबीर बेग यांची निवड करण्यात आली. सभापती व समिती सदस्यांच्या निवडीनंतर नगराध्यक्ष अनिल केंदळे यांच्या हस्ते नवनिर्वाचित सभापती व सदस्यांचा सत्कार करण्यात आला. भाजप–उद्धवसेनेच्या या सत्तावाटपामुळे नगरपरिषदेत स्थैर्य येणार असून, विकासकामांना गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मात्र परस्परविरोधी पक्षांची ही राजकीय युती आगामी काळात कितपत टिकते, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top