परभणी : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या शिक्षक सेलचे राज्यप्रमुख प्रा. किरण शिवसांब सोनटक्के यांनी आपल्या पदाचा आणि प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा सोमवार, 19 जानेवारी रोजी दिला आहे. प्रा. किरण सोनटक्के यांनी आपल्या राजीनाम्याचे पत्र प्रदेशाध्यक्ष आ. शशिकांत शिंदे यांच्याकडे पाठवले आहे. ऐन जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीची धामधूम सुरु असतांना प्रा. सोनटक्के यांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जबर धक्का बसला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या शिक्षक सेलमध्ये गेल्या 21 वर्षापासून प्रा. किरण सोनटक्के विविध पदावर कार्यरत होते. मनपा निवडणुकीत पक्षाने घेतलेल्या भूमिकेमुळे पक्षाचे मोठे नुकसान झाले असल्याचा आरोप प्रा. किरण सोनटक्के यांनी आपल्या राजीनाम्यात केला आहे. तसेच पक्षाचे दिवसेंदिवस होणारे नुकसान आणि बदनामी असाह्य होत असल्याने आपण आपल्या पदाचा आणि पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याचे पत्रात नमूद केले आहे. तसेच पक्षप्रमुख खा. शरद पवार, कार्याध्यक्ष खा. सुप्रिया पवार-सुळे, खा. फौजिया खान, आमदार रोहित पवार, प्रदेशाध्यक्ष आ. शशिकांत शिंदे यांनी पक्षात केलेल्या सहकार्याबद्ल त्यांनी आभार मानले आहे.