6.16 percent polling completed in first phase in Buldhana district : विधानसभा निवडणूकीसाठी आज २०, नोव्हेंबर रोजी सकाळी ७ वाजlतापासून मतदान प्रक्रियेस प्रारंभ झाला. पहिल्या दोन तासात बुलढाणा जिल्ह्यात ६.१६ टक्के मतदान झाले.
बुलढाणा : विधानसभा निवडणूकीसाठी आज २०, नोव्हेंबर रोजी सकाळी ७ वाजlतापासून मतदान प्रक्रियेस प्रारंभ झाला. पहिल्या दोन तासात बुलढाणा जिल्ह्यात ६.१६ टक्के मतदान झाले. मलकापूरात मतदारांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून येत आहे. लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होऊन, राष्ट्रीय कार्यात आपले कर्तव्य पार पाडावे असे, आवाहन निवडणूक आयोगाकडून करण्यात आले आहे.
जिल्ह्यात एकूण सात मतदारसंघ असून, यामध्ये मलकापूर मतदार संघात पहिल्या दोन तासात सर्वाधिक मतदान झाले. मतदार संघ निहाय टक्केवारी जाणून घेतल्यास, जळगाव जामोद ५.२३ टक्के, खामगाव – ६.९७, मलकापूर – ७.१२, मेहकर -६.५४, सिंदखेडराजा- ६.४९, बुलढाणा – ५.९१, चिखली- ४.९१
सकाळी सात ते नऊ दरम्यान हे, मतदान झाले असून अधिकाधिक संख्येने मतदान प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहेत.