22 sheep died due to poisoning in Bhokardan: भोकरदन तालुक्यातील (जि. जालना) पारद खुर्द शेतशिवारात २२ मेंढ्या दगावल्याची माहिती समोर आली आहे. नाशिक जिल्ह्यातील कासारी (ता.नांदगाव) येथील मेंढपाळ अंबादास शिंगाडे हे मागील चार दिवसांपासून पारद खुर्द (ता.भोकरदन) येथील शेतकरी संजय लक्कस यांच्या शेतामध्ये मेंढ्या चारून अख्खर बसवीत होते.
धावडा (जि.जालना) : भोकरदन तालुक्यातील पारद खुर्द येथील शेतकरी संजय लक्कस यांच्या शेतामध्ये नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील कासारी येथील मेढपाळ अंबादास शिंगाडे हे कुटुंबासह गेल्या तीन चार दिवसापासून मेंढ्या चारून अख्खर बसवीत असताना अचानक कळपातील मेंढ्या दगाविण्यास सुरुवात झाली. 28 मार्चपर्यंत 22 मेंढ्या दगावल्याची माहिती समोर आली आहे.
शेतकरी संजय लक्कास यांनी पशुधन पर्यवेक्षक डॉ. संजय जोशी, डॉ. उत्कर्ष वानखेडे, भोकरदन पंचायत समिती आणि तलाठी अंकुश बावस्कर यासोबतच पारध पोलीस स्टेशनचे सहय्यक पोलीस निरीक्षक गुसिंगे यांना याबाबत माहिती दिली. या सर्वांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी करून मेंढपाळाला धीर देण्याचा प्रयत्न केला. पोलिसांसह तलाठी यांनी पंचनामा करून पशुधन पर्यवेक्षक डॉ. संजय जोशी आणि डॉ. उत्कर्ष वानखेडे यांनी मृत मेंढ्याचे शवविच्छेदान करुन वरिष्ठांना अहवाल पाठविला. या दुर्घटनेमुळे मेंढपालक आणि मेंढपाळांचे मोठे नुकसान झाले आहे. शासनाने त्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी परिसरातील सर्व शेतकऱ्यांनी केली जात आहे.
मेंढ्यांना(sheep)फूड पाॅयझन झाल्याची शक्यता
उन्हात मेंढरं फिरल्यानंतर खाऊन त्यांनी लगेच पाणी पिल्याने त्यांचे पोट फुगले. एकंदरीत मेंढ्यांना फूड पॉयझन झाल्याचा प्राथमिक अंदाज पशुधन पर्यवेक्षकांनी व्यक्त केला आहे. मेंढपाळ यांनी सकाळी 11 वाजेपर्यंत जनावरांना चारापाणी करून सावलीत बसवावे. नंतर पाच वाजल्यानंतर चारापाणी करून उन्हापासून आणि विषबाधेपासून त्यांचा बचाव करावा अशी माहिती डॉक्टर संजय जोशी यांनी दिली.