18 office bearers of Shiv Sena resigned: गुलमंडी हा शिवसेना उबाठा गटाचा बालेकिल्ला मानला जातो. शिवसेनेच्या पहिल्या शाखेची सुरुवात येथूनच झाली होती. शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमूख किशनचंद तनवानी यांचे 18 समर्थकांनी शिवसेना (उबाठा) पक्षातील पदांचा सामुहिक राजीनामा गटबाजीला कंटाळून दिला असल्याची माहिती पत्रकार परिषदेत उपजिल्हाप्रमुख सचिन जवेरी, विभागप्रमुख सोमनाथ बोंबले यांनी गुरुवार, 7 नोव्हेंबर रोजी दिली.
छत्रपती संभाजीनगर : गुलमंडी हा शिवसेना उबाठा गटाचा बालेकिल्ला मानला जातो. शिवसेनेच्या पहिल्या शाखेची सुरुवात येथूनच झाली होती. शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमूख किशनचंद तनवानी यांचे 18 समर्थकांनी शिवसेना (उबाठा) पक्षातील पदांचा सामुहिक राजीनामा गटबाजीला कंटाळून दिला असल्याची माहिती पत्रकार परिषदेत उपजिल्हाप्रमुख सचिन जवेरी, विभागप्रमुख सोमनाथ बोंबले यांनी गुरुवार, 7 नोव्हेंबर रोजी दिली.
त्यांनी पुढे सांगितले आम्ही पक्षात हिंदूत्वासाठी अनेक आंदोलने व पक्षात राहून अनेक केसेस अंगावर घेतले परंतु चंद्रकांत खैरे व अंबादास दानवे यांचे दोन गट असल्याने पक्षात मान सन्मान मिळत नाही. महत्वाचे पदे हि दोन्ही नेत्यांनी आपल्या मुलांना दिले. तनवानींनी निवडणुकीतून माघार घेतल्याने जिल्हाप्रमुख पद काढून घेतले. यामुळे पदाधिकारी नाराज झाले आहे. पुढची दिशा दोन दिवसात ठरवणार आहे. उध्दव गटाने औरंगाबाद मध्य मधून आपला उमेदवार निवडून आणून दाखवावा असे आव्हान सोमनाथ बोंबले यांनी केले आहे. यावेळी जिल्हा समन्वयक युवासेना आदीत्य दहीवाल, विभाग प्रमुख मुकेश वाघुले, हर्सुल, विभागप्रमुख उत्तमनगर, उपजिल्हाप्रमुख, गुलमंडी सुधीर नाईक, उपशहर प्रमुख योगेश अष्टेकर, अमित धनघाव, मोहसीन खान, माजी नगरसेवक रविंद्र गांगे, उत्तम अंभोरे, प्रकाश फुले, माजी नगरसेवक संतोष सुरे, उपविभागप्रमुख हडको मिलिंद सेवलीकर, उपविभागप्रमुख एकतानगर आजेश दाभाडे, पुनम गंगावने, अशोक गायकवाड, एकतानगर, राम फुलंब्रीकर, गुलमंडी, युवासेना यांनी राजीनामा दिला आहे.