Road Accident in Pakistan : पाकिस्तानातील अपघातात एकाच कुटुंबातील 13 जणांचा मृत्यू

Road Accident in Pakistan

Road Accident in Pakistan : पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात शनिवारी एक मिनी ट्रक रस्त्यावरून घसरून खड्ड्यात पडल्याने त्यात प्रवास करणाऱ्या पाच मुलांसह एका कुटुंबातील 13 जणांचा मृत्यू झाला, तर अन्य नऊ जण जखमी झाले आहेत.

Road Accident in Pakistan
Road Accident in Pakistan

लाहोर : पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात शनिवारी एक मिनी ट्रक रस्त्यावरून घसरून खड्ड्यात पडल्याने त्यात प्रवास करणाऱ्या पाच मुलांसह एका कुटुंबातील 13 जणांचा मृत्यू झाला, तर अन्य नऊ जण जखमी झाले आहेत.
‘रेस्क्यू-1122’ नुसार, हा मिनी ट्रक खैबर पख्तुनख्वा प्रांतातील बन्नू जिल्ह्यातून पंजाबच्या खुशाब जिल्ह्याच्या दिशेने येत असताना हा अपघात झाला. लाहोरपासून सुमारे 250 किमी अंतरावर असलेल्या खुशाबच्या पेंच पीर भागातील एका वळणावर मिनी ट्रक रस्त्यावरून घसरला आणि खड्ड्यात पडला. एका अधिकाऱ्याने सांगितले की, पाच मुलांसह १३ जणांचा जागीच मृत्यू झाला. नऊ जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. काही प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, अतिवेगाने मिनी ट्रकच्या चालकाचे नियंत्रण सुटले, त्यामुळे हा अपघात झाला. पंजाबच्या मुख्यमंत्री मरियम नवाज यांनी या दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला असून जखमींना चांगल्या उपचार सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »