dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

शाश्वत मराठा आरक्षणासाठी नवव्या दिवशी उपोषण सुरूच

प्रशासन दखल घेत नसल्याने आंदोलकांमध्ये नाराजी

उपोषणकर्ते राजेंद्र दाते पाटील यांच्या मागण्यांकडे शासन आणि प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात येत आहे. पालकमंत्री संजय शिरसाठ यांनी उपोषणस्थळी भेट देऊन उपोषणकर्त्यांशी चर्चा केली आहे. मात्र, त्यानंतरही प्रशासन पातळीवर ठोस निर्णय झालेला नसल्याने उपोषण सुरूच आहे.

छत्रपती संभाजीनगर : शाश्वत मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाचे राजेंद्र दाते पाटील यांनी छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय आयुक्त कार्यालयासमोर सुरू केलेल्या उपोषणाचा सोमवारी नववा दिवस आहे. उपोषणाला नऊ दिवस उलटूनही प्रशासनाकडून ठोस कार्यवाही झालेली नसल्याने मराठा समाजातून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

उपोषणकर्ते राजेंद्र दाते पाटील यांच्या मागण्यांकडे शासन आणि प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात येत आहे. पालकमंत्री संजय शिरसाठ यांनी उपोषणस्थळी भेट देऊन उपोषणकर्त्यांशी चर्चा केली आहे. मात्र, त्यानंतरही प्रशासन पातळीवर ठोस निर्णय झालेला नसल्याने उपोषण सुरूच आहे. उपोषणस्थळी प्रा. माणिक शिंदे, सुनील कोटकर, योगेश शेळके यांच्यासह मराठा आरक्षणासाठी लढा देणारे कार्यकर्ते ठाण मांडून आहेत. आंदोलनाला दिवसेंदिवस पाठिंबा वाढत असून, प्रशासनाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दुसरीकडे, हैदराबाद गॅझेटच्या अनुषंगाने मराठा आरक्षणाचा शासन निर्णय काढताना नेमक्या कोणत्या दुरुस्त्या करणे आवश्यक आहे, याबाबत मनोज जरांगे यांनी अंतरवली सराटी येथे समन्वयकांची बैठक घेतली. आरक्षणाच्या प्रश्नावर राज्यभर विविध पातळ्यांवर हालचाली सुरू असताना छत्रपती संभाजीनगरातील उपोषणाकडे प्रशासनाकडून अद्याप अपेक्षित गांभीर्याने पाहिले जात नसल्याची भावना आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली आहे.
उपोषणाचा नववा दिवस सुरू झाल्याने आता शासन या आंदोलनाची कधी दखल घेते आणि पुढील निर्णय काय होतो, याकडे मराठा समाजाचे लक्ष लागले आहे.

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top