dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

अवघी दुमदुमली जनकपुरी… वारकरी संत साहित्य संमेलन :  जालना शहरातून ग्रंथदिंडी

जालना :  वारकरी संत साहित्य संमेलनानिमित्त काढण्यात आलेल्या ग्रंथदिंडीतील ‘राम कृष्ण हरी’ च्या जयघोषाने शनिवार, 13 डिसेंबर रोजी अवघे जनकपुर अर्थात जालना शहर दुमदुमले. 

जालना :  वारकरी संत साहित्य संमेलनानिमित्त काढण्यात आलेल्या ग्रंथदिंडीतील ‘राम कृष्ण हरी’ च्या जयघोषाने शनिवार, 13 डिसेंबर रोजी अवघे जनकपुर अर्थात जालना शहर दुमदुमले. 

       जेईएस महाविद्यालयात आयोजित वारकरी संत साहित्य संमेलनानिमित्त शनिवारी जालना शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळून ग्रंथदिंडी काढण्यात आली. संमेलनाध्यक्ष डॉ. रामकृष्ण महाराज लहवितकर यांच्या हस्ते या ग्रंथदिंडीचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य प्रा. श्रीधर नांदेडकर यांची विशेष उपस्थिती होती. 

     भजनी मंडळ, विविध शाळा व वारकऱ्यांच्या मोठ्या सहभागाने तसेच ‘ राम कृष्ण हरी’ च्या जयघोषाने ही ग्रंथदिंडी लक्षवेधी ठरली. विठ्ठल- रुख्मिणी व वारकऱ्यांच्या वेशभूषेतील शालेय विद्यार्थी या ग्रंथदिंडीचे आकर्षण ठरले. 

     छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, बडी सडक मार्गे ही ग्रंथदिंडी जेईएस महाविद्यालयात विसर्जित झाली. ग्रंथदिंडीत संमेलनाचे स्वागताध्यक्ष प्राचार्य डॉ. गणेश अग्निहोत्री, कार्यवाह डॉ. यशवंत सोनुने,उपप्राचार्य महेंद्र सदावर्ते, सतीश महाराज बनकर, प्रमोद कुमावत, विष्णु महाराज बारड,पांडुरंग महाराज बोंद्रे,सोनुने गुरूजी, नंदकिशोर डंबाळे,डॉ.एकनाथ शिंदे, डॉ. राजेंद्र सोनवणे, डॉ. हेमंत वर्मा,डॉ.सुजाता देवरे, शाहीर अप्पासाहेब उगले, राजाभाऊ मगर यांच्यासह शिक्षक- प्राध्यापक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. दरम्यान, वारकरी संत साहित्य संमेलनानिमित्त ग्रंथप्रदर्शनाचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top