dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

देऊळगाव राजा नगराध्यक्ष, नगरसेवक पदासाठी आज होणार मतदान : शेगाव, खामगाव व जळगाव जामोद नगरसेवक पदासाठी लढत

बुलढाणा : जिल्ह्यातील ११ नगर पालिका  नगराध्यक्ष पदासह नगरसेवक पदाच्या निवडणुकीसाठी २ डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार होती. परंतु आक्षेपाच्या अपिली न्यायालयात वेळीच निकाली न निघल्याचे कारण पुढे करीत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार देऊळगाव राजा नगर पालिकेची संपूर्ण निवडणूक तसेच खामगाव, शेगाव व जळगाव जामोद मधील काही प्रभागातील नगरसेवक पदाची निवडणूक प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली होती. त्यासाठी २० डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तर २१ डिसेंबर रोजी सर्व नगर पालिकांचे निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

 २ डिसेंबर रोजी १० नगर पालिका नगराध्यक्ष व २५६ नगर सेवक पदासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. नगराध्यक्षासह नगरसेवक पदासाठी घेण्यात आलेल्या या निवडणूक प्रक्रिया दरम्यान कुठे शांततेत, तर कुठे गोंधळ झाल्याचे दिसून आले. जिल्ह्यातील ३ लाख १० हजार ६९० मतदारांनी मतदानाचा हक्क बजवाला. मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर सर्व बूथवरील ईव्हीएम मशीन योग्य पध्दतीने हाताळत  सीलबंद करुन स्ट्राँगरुमध्ये ठेवण्यात आल्या आहेत. स्टाँगरुममधील ईव्हीएमच्या सुरक्षेसाठी शस्ञधारी जवान व स्थानिक पोलिस अधिकारी व कर्मचारी खडा पहारा देत आहेत. तर परिसरातील प्रत्येक हालचालींवर सीसीकॅमेऱ्याच्या माध्यमातून लक्ष ठेवले जात आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार पुढे ढकलण्यात आलेल्या जिल्ह्यातील देऊळगाव राजा नगराध्यक्षासह १० प्रभागातील २० नगरसेवक असे एकूण २१ जागासाठी तर खामगाव नगर पालिकेच्या प्रभाग क्र. ५ अ, ७ ब, ९ ब, १६ ब असे एकूण ४, शेगाव येथे प्रभाग क्र. ४ अ, ४ ब, २ व जळगाव जामोद ६ अ, ६ ब, ७ ब ३ नगरसेवक पदासाठी आज शनिवार २० डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
Scroll to Top